- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल उचलतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलीच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने वडिलांनी दहावीत शिकणाऱ्या मुलीकडील मोबाइल काढून घेतला.याचा राग आल्याने मुलीने मध्यरात्री घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.भूमिका कोलचलीवार वय १५ वर्षे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. भूमिका ही मोबाइलच्या आहारी गेली होती.सतत मोबाइलमध्ये व्यस्त राहत असल्याने तिच्या शिक्षणावर परिणाम होईल,अशी चिंता पालकांना सतावू लागली.मोबाइलच्या अतिवापरामुळे पालक तिला वेळोवेळी समज देत होते.रात्री कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले.भूमिकाची आई घरातील दुसऱ्या खोलीत झोपली होती.दरम्यान,पहाटे सुमारे तीन वाजता तिला जाग आली.भूमिका दिसत नसल्याने आईने तिचा शोध घेतला.तिने समोरच्या खोलीत पाहिले असता तिच्या पायाखालची जमीनच सरकली.भूमिकाला गळफास घेतलेल्या स्थितीत पाहून आईने टाहो फोडला.कुटुंबीयांनी भूमिकाला खाली उतरवून तातडीने रुग्णालयात दाखल केले.मात्र,डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती हुडकेश्वर पोलीस प्रशासनास मिळताच पोलिसांनी घटनेची नोंद केली.
- Advertisement -

