Thursday, September 3, 2026
Homeनागपूरडान्स ग्रुपमध्ये सहभागी करण्याचे आमिष; अल्पवयीन मुलींची फसवणूक व अपहरण.. - चार...

डान्स ग्रुपमध्ये सहभागी करण्याचे आमिष; अल्पवयीन मुलींची फसवणूक व अपहरण.. – चार मुलींची सुटका; दोन मुली गडचिरोलीतील.. – देसाईगंज तालुक्याच्या आमगाव येथील एका आरोपीचा समावेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नवे युग नवी कला.त्यातच आपल्याच धुंदीत आजची तरुणाई भरकटलेली असल्याचे दिसून येत आहे.कोण,कधी,कुठल्या स्तरावर जाऊन पोहचेल,हे सांगताच येत नाही.अशातच अल्पवयीनांना फुस लावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.असाच काहीसा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.पुण्यातील डान्स ग्रुपमध्ये सहभागी करण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींची फसवणूक व अपहरण करीत त्यांना पुणे शहराऐवजी उत्तर प्रदेशात नेल्याचे उघड झाल्याने  प्रकरणात नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या तावडीतून चार तरुणींची नुकतीच सुटका केली आहे.पोलिसांनी सदर तरुणींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.अतुल श्रीराम बनारसे वय ३१ वर्षे,रा.आमगाव,ता.देसाईगंज (वडसा), जि.गडचिरोली व सत्यपाल कवडू बनारसे वय ३५ वर्षे,रा.ताडगाव,ता. अर्जुनी-मोरगाव,जि.गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून,त्यांना उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे.
माहितीनुसार,नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्याच्या खापा शहरातील दोन कुटुंबांनी त्यांच्या अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची तक्रार शुक्रवार २१ मार्च रोजी खापा पोलिस ठाण्यात नोंदविली होती.या मुली २० मार्चपासून बेपत्ता असल्याचे त्यांनी तक्रारींमध्ये नमूद केले होते. तांत्रिक माहितीच्या आधारे त्या मुली उत्तर प्रदेशात असल्याचे स्पष्ट होताच खापा पोलिसांचे पथक रविवारी २३ मार्चला रामपूर (उत्तर प्रदेश) येथे पोहोचले.त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने मुलींचा शोध घेतला आणि सत्यपाल व अतुल या दोघांना अटक केली.त्यांच्याकडून चार मुलींची सुटका करीत सर्वांना मंगळवारी २५ मार्चला खापा शहरात नेण्यात आले.याप्रकरणी खापा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.पोलिसांनी या प्रकाराचा गांभीर्याने तपास करीत सायबर सेलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेतली.यात दोनपैकी एका मुलीचा मोबाइल क्रमांक ट्रेस करण्यात सायबर सेलला यश आले.हा क्रमांक उत्तर प्रदेशातील जौनपूर (जि.रामपूर) परिसरात सक्रिय असल्याचे स्पष्ट होताच खापा पोलिसांचे पथक २२ मार्चला जौनपूरकडे रवाना झाले.सुटका करण्यात आलेल्या दोन मुली खापा शहरातील रहिवासी असून,दोघी गडचिरोली येथील आहेत.या चौघीही अल्पवयीन आहेत.त्यांना कोणत्या उद्देशाने उत्तर प्रदेशात नेले होते,हे स्पष्ट झाले नाही. आरोपींनी या मुलींचे देहव्यापारासाठी अपहरण केले असावे,अशी शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!