Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविसाव्यासाठी बसथांब्याजवळ थांबलेल्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू; राज्यातील पहिला बळी..

विसाव्यासाठी बसथांब्याजवळ थांबलेल्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू; राज्यातील पहिला बळी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाचा तडाखा कमी-जास्त जरी असला तरीही,काही भागात उष्णतेची लाट उसळू लागली आहे.उन्हात गेल्यानंतर जीव कासावीस होऊन शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. अशातच भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वेळोवेळी उष्णतेच्या लाटे बाबत माहिती देण्यात येत असतांनाच काल,बुधवारी २६ मार्चला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील निमखेडी बसथांब्याजवळ विसाव्यासाठी थांबलेल्या अमोल दामोदर बावस्कर वय २५ वर्षे या तरुणाचा उष्माघाताने अचानक मृत्यू झाला असून उष्माघाताचा हा राज्यातील पहिला बळी ठरला आहे. दरम्यान, उष्माघाताचा धोका वाढत चालल्याने राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.उन्हात बाहेर पडतांना नागरिकांनी दक्षता घ्यावी,उन्हात विशेषतः दुपारी १२ ते ३ या काळात बाहेर जाणे टाळावे,असे आवाहन करण्यात आले आहे.उद्या,शुक्रवार २८ मार्चला पासून तापमान थेट ३ अंशांनी वाढणार असून, पुढील दोन दिवस शुक्रवारी आणि शनिवारी पारा थेट चाळीशीच्या घरात जाईल. आठवडाभरातील हे सर्वाधिक कमाल तापमान असेल.रविवारी पारा ३५ अंश सेल्सिअस येईल. आठवड्यात तापमानात होणारी वाढ पाहता मार्च महिन्याचा शेवट कडक उन्हाच्या तडाख्याने होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविला असून नागरिकांनी अकारण उन्हा-तान्हात फिरू नये व आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!