Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.....

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या
वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ,
अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात येतो.या पुरस्कारासाठी राज्यातील विविध शिक्षण संस्थांमधून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व प्राचार्यांची निवड करण्यात येते.शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सन २०२४-२५ या वर्षाच्या पुरस्कार यादीत आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंजचे प्राचार्य प्रा.डॉ.श्रीराम गहाणे यांची आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांनी आदर्श महाविद्यालयाच्या शैक्षणिक,प्रशासकीय व संस्थात्मक विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे,आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षण प्रक्रियेत प्रभावी वापर व्हावा,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी तसेच महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ व्हावी यासाठी त्यांनी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता,विद्यार्थी विकास,संशोधन,डिजिटल शिक्षण, पायाभूत सुविधा,सामाजिक बांधिलकी तसेच विविध विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे.विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा, सांस्कृतिक,क्रीडा,सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन संस्थेच्या विकासासाठी त्यांनी केलेले नियोजनबद्ध कार्य,शैक्षणिक प्रशासनातील कार्यक्षमता, विद्यार्थ्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील योगदान यांची शासनाने दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड केली आहे.
येत्या,शनिवार ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते प्रा.डॉ.श्रीराम गहाणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्कारामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या तसेच देसाईगंज तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नूतन शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंजचे अध्यक्ष जगदिश शर्मा,सचिव मोतीलाल कुकरेजा तसेच सर्व पदाधिकारी,आदर्श महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद,शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ तथा मित्रपरिवार यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून,त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!