Wednesday, September 16, 2026
Homeदेसाईगंज२४ वर्षीय तरुणीची देसाईगंज जवळील वैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या…-येणाऱ्या जाणाऱ्यांनी...

२४ वर्षीय तरुणीची देसाईगंज जवळील वैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या…-येणाऱ्या जाणाऱ्यांनी व्हिडिओ,फोटो काढले; मात्र, वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली):- ब्रम्हपुरी येथील एका २४ वर्षीय तरुणीने देसाईगंज जवळील वैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना मंगळवारी,दिनांक- १६ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.ईशा घनश्याम बिंजवे वय २४ वर्षे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.आत्महत्या केलेली तरुणीनी ब्रम्हपुरी येथील निवासी डॉक्टर घनश्याम बिंजवे यांची मुलगी आहे.

सविस्तर वृत्त असे की,तरुणी ही दुचाकी ॲक्टिवा क्रमांक-एमएच-४९,झेड- ४१७६ ने देसाईगंज येथील वैनगंगा नदीच्या पुलावर सायंकाळच्या सुमारास आली.पुलावर दुचाकी उभी केली.त्या गाडीवर आपल्या चप्पल ठेवल्या.त्यानंतर नदीच्या पुलावरून उडी घेतली.नदीच्या पात्रात पाणी कमी असल्याने ती बचावली.मात्र,आत्महत्या करण्याचा निश्चय करून आल्याने तिने त्याच नदीमध्ये जास्त पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा उडी घेतली.यावेळी मात्र पाणी अधिक असल्याने ती वर आलीच नाही.या घटनेचा पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या काहींनी व्हिडीओ काढला.मात्र, वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही.घटनेनंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला.रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागला नव्हता.काल,बुधवारी सायंकाळी वैनगंगा नदीच्या नीरज गावाजवळील पात्रामध्ये तिचा मृतदेह आढळून आला.आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

अनेकजण व्हिडिओ,फोटो काढण्यात व्यस्त👇

वैनगंगा नदीच्या पुलावर ईशाने आपली दुचाकी उभी केली.त्यानंतर तिने आत्महत्या केली.या घटनेचा अनेकांनी व्हिडीओ,तर काहींनी फोटो काढले.मात्र, तिला वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही.पहिल्या प्रयत्नानंतर नागरिकांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता,असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा: क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ नाटकातील नाट्यांश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिध्द नाटककार तथा महाराष्ट्र शासन पुरस्कृत साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या...

सिंदेवाहीत अभियंता दिन उत्साहात साजरा.. – गडबोरीच्या विद्यार्थ्यांना नवोदय मार्गदर्शिका व शैक्षणिक साहित्याचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त गडबोरी येथील...

‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे.. – ‘लोकसंवाद-२०२६’मधून विविध शासकीय योजनांची माहिती; ‘वीर योजना’बाबतही जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभरात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘लोकसंवाद-२०२६’ आणि ‘श्री गणेशा आरोग्याचा...

मोबाइलचा अतिवापर; अभ्यासाकडे दुर्लक्ष.. -पालकांनी मोबाइल काढून घेताच तरुणीने सोडले घर..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोफत इंटरनेट,त्यातच फोनवरील अमर्यादित संभाषणे आणि रिल्समुळे दिवस कसा काय निघून जातो; हे अनेकांना कळतच नाही.एकदा कां मोबाईलची सवय जडली,तर ती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!