Wednesday, September 16, 2026
Homeगडचिरोलीचुडाराम बल्हारपुरे यांच्या 'गोंडवानाचा महायोध्दा: क्रांतिवीर बाबूराव शेडमाके' नाटकातील नाट्यांश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात..

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा: क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ नाटकातील नाट्यांश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विदर्भातील प्रसिध्द नाटककार तथा महाराष्ट्र शासन पुरस्कृत साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या ‘गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ या नाटकातील नाट्यांश (अंक ३,प्रवेश ६)गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या बी.ए.तृतीय वर्षाच्या गोंडवाना भाषावैभव-भाग ३,सत्र ५ च्या अभ्यासक्रमात नविन शिक्षण धोरण अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील साहित्यिक,सांस्कृतिक व नाट्य क्षेत्रातील लौकिकाचे कौतुक करून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.गोंडवानाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाचे रान करुन वयाच्या २५ व्या वर्षी शहीद झालेल्या चांदागडच्या सुपुत्राची-आदिवासी गोंडराजाची शौर्यगाथा असलेल्या या नाटकाची विद्यापीठाने दखल घेतल्यामुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी या नाटकाचा अभ्यास करणार आहेत व गडचिरोली जिल्ह्यातील या आद्य क्रांतीकारकाच्या इतिहासाला नविन उजाळा मिळणार आहे,असे मत जाणकारांनी व्यक्त केले.
चुडाराम बल्हारपुरे यांचे ‘गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ हे केवळ झाडीपट्टीतच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात गाजलेले नाटक असून शासन स्तरावरुन या नाटकाचे अनेक प्रयोग अनिरुध्द वनकर यांचे दिग्दर्शनाखाली सादर झालेले आहेत. तसेच राज्य परिवहन महामंडळ,गडचिरोली यांचेतर्फे देखील या नाटकाचे प्रयोग विभागीय स्तरावर नाट्यस्पर्धांमधून सादर करण्यात आले आहेत.विविध संस्थांचे राज्यस्तरीय १० पुरस्कार या नाटकास प्राप्त झालेले आहेत.चुडाराम बल्हारपुरे यांनी गोंडवाना विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे आभार मानले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिंदेवाहीत अभियंता दिन उत्साहात साजरा.. – गडबोरीच्या विद्यार्थ्यांना नवोदय मार्गदर्शिका व शैक्षणिक साहित्याचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त गडबोरी येथील...

‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे.. – ‘लोकसंवाद-२०२६’मधून विविध शासकीय योजनांची माहिती; ‘वीर योजना’बाबतही जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभरात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘लोकसंवाद-२०२६’ आणि ‘श्री गणेशा आरोग्याचा...

मोबाइलचा अतिवापर; अभ्यासाकडे दुर्लक्ष.. -पालकांनी मोबाइल काढून घेताच तरुणीने सोडले घर..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोफत इंटरनेट,त्यातच फोनवरील अमर्यादित संभाषणे आणि रिल्समुळे दिवस कसा काय निघून जातो; हे अनेकांना कळतच नाही.एकदा कां मोबाईलची सवय जडली,तर ती...

आता गडचिरोलीत होणार पर्यटन महोत्सव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील निसर्गसंपन्न,ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळांना व्यापक प्रसिद्धी देऊन पर्यटनाला चालना देण्यासोबतच स्थानिक रोजगार व अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने  २३ सप्टेंबर ते...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!