Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीमाता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. - मातामृत्यू कमी...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची सिझेरियन शस्त्रक्रिया करून माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे
  • अतिजोखमीच्या गर्भवती मातांच्या संख्येत वाढ👇

जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातून गंभीर व अतिजोखमीच्या गर्भवती माता मोठ्या प्रमाणात संदर्भित होत आहेत.अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये वेळेवर योग्य उपचार उपलब्ध करून देणे हे आरोग्य यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे.अतिजोखमीच्या गर्भवती माता,गंभीर नवजात बालके तसेच विविध गुंतागुंतीच्या वैद्यकीय प्रकरणांमध्ये संदर्भित रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालयावरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे.उपलब्ध विशेषज्ञ डॉक्टर,वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ मर्यादित असतांनाही आरोग्य यंत्रणा २४ तास कार्यरत राहून गंभीर रुग्णांना आवश्यक उपचार व सेवा देत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला व बाल रुग्णालयाकडे दुर्गम व आदिवासी भागातून गंभीर रुग्ण संदर्भित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.चालू कालावधीत जवळपास ६ हजार रुग्ण संदर्भित झाले असून,हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.त्यामुळे रुग्णालयीन सेवांवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला असूनही वैद्यकीय पथक सातत्याने गंभीर रुग्णांना सेवा देत आहे.

  • सामाजिक व कौटुंबिक अडचणींमुळे होणारा विलंब चिंताजनक👇
अलीकडेच मुरुमगाव परिसरातील दिव्या रामसिंग उसेंडी,वय ३१ वर्षे,या गर्भवती महिलेच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेत असे निदर्शनास आले की,सदर महिलेची गर्भावस्थेदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नोंदणी करण्यात आलेली नव्हती.आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी सज्ज असतांना सामाजिक व कौटुंबिक अडचणींमुळे उपचारासाठी आरोग्य संस्थेत वेळेवर न पोहोचणे ही बाब गंभीर चिंतेची आहे.
संबधित महिलेची गर्भधारणेदरम्यान नियमित नोंदणी, ANC तपासणी व सातत्यपूर्ण आरोग्य तपासणी अपेक्षित प्रमाणात झाल्याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध नाहीत. गर्भधारणेच्या कालावधीत नियमित फॉलोअप,घरभेटी, जोखीम ओळख व संस्थात्मक प्रसूतीचे नियोजन यामध्ये अपेक्षित सातत्य नसल्याचे माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी,जि.प.गडचिरोली यांचेकडून प्राप्त झालेली आहे.
अत्यंत शेवटच्या क्षणी,गंभीर गॅस्पिंग अवस्थेत तिला रुग्णालयात आणण्यात आले.वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले असले तरी दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला,अशी माहिती माधुरी किलनाके,वैद्यकीय अधीक्षक,महिला व बाल रुग्णालय गडचिरोली यांनी दिली.अशा घटनांमध्ये आरोग्य संस्थेत वेळेवर पोहोचण्यास होणारा विलंब, म्हणजेच उपचार घेण्याचा निर्णय घेण्यात व आरोग्य संस्थेपर्यंत पोहोचण्यात होणारा प्रारंभिक विलंब,हा माता मृत्यूच्या जोखमीमध्ये भर घालणारा महत्त्वाचा घटक ठरू शकतो.
  • वेळेवर नोंदणी व नियमित तपासणीचे आवाहन👇
गरोदरपणाची चाहूल लागताच प्रत्येक महिलेने पहिल्या तिमाहीत स्थानिक आशा सेविका,प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेत गर्भावस्थेची नोंदणी करून नियमित तपासण्या करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.तसेच आवश्यकतेनुसार तातडीने उपचारासाठी आरोग्य संस्थेत पोहोचण्यास प्राधान्य द्यावे.सामाजिक अथवा कौटुंबिक अडचणींमुळे गर्भावस्थेतील तपासणी टाळू नये.नियमित तपासणीमुळे रक्ताची कमतरता,उच्च रक्तदाब,संसर्ग तसेच गर्भावस्थेतील इतर संभाव्य गुंतागुंती वेळेत ओळखता येतात.त्यामुळे आवश्यक उपचार तातडीने उपलब्ध करून देणे शक्य होते व माता व बालकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य वैद्यकीय नियोजन करता येते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!