- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोच्छी धरण परिसरात घडली होती.दिनेश हिरूजी उईके वय ३६ वर्षे,रा.रिसाला,ता.सावनेर,जि.नागपूर असे धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव असून ते धरण परिसरातील काठावर उभे राहून बैल धुत असतांनाच त्यांचा पाय घसरला व धरणातील खोल पाण्यात पडून बुडाले होते.दरम्यान,घटनेची माहिती मिळताच खापा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दिवसभर तसेच रात्रीपर्यंत धरण परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र, त्यांचा मृतदेह सापडलेला नव्हता.अश्यातच आज,गुरुवार १० सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास बावनगाव नदीच्या काठावर दगडात अडकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.मृतदेह बाहेर काढून सावनेर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ऐन सणाच्या दिवशीच मृत्यूची बातमी उघडकीस आल्याने उईके कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
- Advertisement -

