Saturday, September 5, 2026
Homeनागपूरसतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.....

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक शाखेतून तब्बल ७३ कोटी ८२ लाख ९२ हजार ८५० रुपयांचे कृषी कर्ज उचलले.बनावट कागदपत्रे आणि कंपन्या तयार करून करोडो रुपये हडपणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एका आरोपीला नागपूर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नागपूर रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे.सचिन खुशाल कारेमोरे वय ४० वर्षे,रा.नेरी,ता.मोहाडी,जि.भंडारा असे अटकेतील एका आरोपीचे नाव आहे.विशेष म्हणजे,नागपूर जिल्ह्याच्या मौदा आणि रामटेक पोलिस ठाण्यांमध्ये आतापर्यंत या प्रकरणात एकूण १६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
टोळीतील आरोपी शेतकऱ्यांना सांगायचे की,पिकांच्या नुकसानीची सरकारी भरपाई म्हणून दरवर्षी १० हजार रुपये मिळतील आणि त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे.या बहाण्याने शेतकऱ्यांकडून आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे घेतले जायचे आणि त्यांच्या नावावर लाखोंचे कृषी कर्ज उचलले जायचे.पोलिस तपासात समोर आले की,एसबीआयच्या मौदा शाखेतून ५४ कोटी ६९ लाख ४२ हजार ८५० रुपये तसेच रामटेक शाखेतून १९ कोटी १३ लाख ५० हजारांचे कृषी कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर उचलले,प्रकरणाचे धागेचोरे आंतरराज्यीय स्तरापर्यंत जोडलेले असल्याची माहिती समोर आली आहे.टोळीचे सदस्य केंद्रीय प्राधिकरणाकडून वेअरहाऊसिंग डेव्हलपमेंट ॲड रेग्युलेटरी अथॉरिटी,दिल्ली येथून कथितरीत्या बनावट वेअरहाऊस लायसन्स मिळवायचे.टोळीने कथितरीत्या बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना न देता या कंपन्यांमध्ये वळवून काढून घेतली.अटक करण्यात आलेला आरोपी सचिन कारेमोरे हा पोलिसांच्या नोंदीनुसार सराईत आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही भंडारा,गडचिरोली आणि अहेरी परिसरात धान्य व धान खरेदीतील फसवणुकीची प्रकरणे दाखल आहेत.आरोपीस ताब्यात घेणारी कारवाई नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक हर्ष ए.पोद्दार,अप्पर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक योगेश कामाले आणि त्यांच्या पथकाने केली.
  • विशेष काळजी घेण्याची गरज👇
शेतकऱ्यांनी आधारकार्ड,पॅनकार्ड, सातबारा किंवा बँकेशी संबंधित कागदपत्रे इतरांना देतांना विशेष काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
कोणत्याही योजनेच्या नावाखाली कागदपत्रे देण्यापूर्वी संबंधित योजना,कर्ज किंवा बँक व्यवहाराची अधिकृत माहिती तपासणे महत्त्वाचे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!