Friday, September 4, 2026
Homeगोंदियाजमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला. त्यानुसार,न्यायालयाने जप्तीचे आदेश देत रक्कम वसूल करण्याचे फर्मान सोडताच थेट उपविभागीय कार्यालयातील एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त करण्यात आल्याने परिसरात एकच चर्चा रंगली.विशेष म्हणजे,शासकीय गाडीही जप्त करण्याचे आदेश होते.मात्र,उपविभागीय अधिकारी(एसडीओ)
हे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेल्याने वाहनाची जप्ती टळली.सदरचा प्रकार गोंदिया शहरात काल गुरुवारी घडला.
गोंदिया शहराच्या क्रीडा संकुल परिसरातील राजू नागवंशी यांच्या मालकीची सुमारे ११ आर जमीन सन २००९ मध्ये भूसंपादन प्रक्रियेत घेण्यात आली होती.या जमिनीच्या मोबदल्याबाबत शासनाकडून रक्कम मिळाली.मात्र,वाढीव मोबदला मिळत नसल्याचा दावा नागवंशी यांनी केला.वाढीव मोबदल्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला.मात्र,अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.या प्रकरणाची सुनावणी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात झाली.न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित रकमेच्या वसुलीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश देण्यात आले.त्यानंतर,काल गुरुवारी तक्रारदार यांच्या वकिलासह न्यायालयातील कर्मचारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात जात कारवाईला सुरुवात केली. यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्या खुर्चीसह कार्यालयातील इतर साहित्य जप्त करण्यात आले. तक्रारदार राजू नागवंशी यांच्या वकिलांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई करण्यात आल्याने कार्यालयात एकच धांदल उडाली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!