Sunday, September 6, 2026
Homeगोंदियातलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.....

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज येथे घडली.जयेंद्र भुमेंद्र चौधरी वय ९ वर्षे, रा.निलज असे तलावात बुडून मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
जयेंद्र व त्याचे काही मित्र गाव नजीकच्या कानाबोडी तलाव परिसरात गेले होते.मित्र तलावात मासे पकडत असतांनाच जयेंद्रला सुद्धा मासे पकडण्याची इच्छा झाली.दरम्यान,तलावाजवळ उभा राहून मासे पकडत असतांना त्याचा पाय घसरला व तो तलावातील पाण्यात पडला.तलाव पाण्याने तुडुंब भरलेला व खोल असल्याने जयेंद्र बुडू लागला.याचवेळी उपस्थित मित्रांनी आरडाओरड केली.मात्र,तलावात पाणी भरपूर असल्याने त्याला वाचवता आले नाही.त्यानंतर,मित्रांनी धावत-पळत जात सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली.लागलीच नागरिकांनी तलावाकडे धाव घेत शोध मोहीम राबविली असता जयेंद्रचा मृतदेह तलावात आढळून आला.घटनेने गावात शोककळा पसरली असून चौधरी कुटूंबीय शोकसागरात बुडाला आहे.
तर दुसऱ्या घटनेत गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील बेरडीपार येथे श्रीकृष्ण मूर्ती विसर्जनादरम्यान भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.कार्तिक गौतम वय ३४ वर्षे असे मृत जवानाचे नाव आहे.कार्तिक गौतम हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते.काही दिवसांपूर्वीच ते सुट्टीसाठी आपल्या मूळ गावी बेरडीपार येथे आले होते.गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि त्यानंतरच्या उत्सवाचा उत्साह सुरू असतांना ते मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते.विसर्जनादरम्यान पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेत त्यांचा बुडून मृत्यू झाला.सुट्टीसाठी गावी आलेल्या जवानाचा अचानकपणे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!