- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी)पुणे यांच्यामार्फत एकरकमी दहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक असून २५ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.या योजनेसाठी उमेदवाराची वयोमर्यादा कमाल ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.अर्जासोबत जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र, ओळख पुरावा तसेच उमेदवाराच्या स्वतःच्या नावे असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकाची प्रत जोडणे आवश्यक आहे.केवळ ऑनलाईन अथवा केवळ ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत,असे स्पष्ट करण्यात आले आहे.या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.उमेदवारांनी १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा.तसेच,अर्जाची स्व-साक्षांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘बार्टी’, पुणे कार्यालयाकडे पोस्ट अथवा कुरियरद्वारे पाठविणे बंधनकारक आहे.
अर्जाची स्व-साक्षांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),२८/२८,क्वीन्स गार्डन,कॅम्प,पुणे- ४११००१ या पत्त्यावर पाठवावी.या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी ०२०-२६३३३३३० अथवा ०२०-२६३३३३३९ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा,असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी)पुणे कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
- Advertisement -

