- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी असून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.जाहीर करण्यात आलेल्या तिसऱ्या यादीमध्ये राज्यातील तब्बल ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.यात नागपूर विभागातील ३० हजार ७३८ शेतकरी,छत्रपती संभाजीनगर विभागातील २ लाख ६ हजार ४५० शेतकरी,अमरावती विभागातील ८५ हजार ७६ शेतकरी, नाशिक विभागातील १४ हजार २४४ शेतकरी,पुणे विभागातील ११ हजार ९२८ शेतकरी,तर कोकण विभागातील २ हजार ७५६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. सदरच्या याद्या ह्या जिल्हा निहाय संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या असून सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची थकबाकी तपासून तातडीने नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रावर’ जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे आणि कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा,असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
- Advertisement -

