Tuesday, October 13, 2026
Homeकुरखेडाधक्कादायक..! आश्रमशाळेतील १४ वर्षीय विद्यार्थिनीने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून केली आत्महत्या..

धक्कादायक..! आश्रमशाळेतील १४ वर्षीय विद्यार्थिनीने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून केली आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय विद्यार्थिनीने आश्रमशाळेच्या वसतीगृहातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीतील पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल सोमवारी सायंकाळी साडे पाच  वाजताच्या सुमारास घडली.राणू कृष्णा हलामी वय १४ वर्षे,रा.मोहगाव, ता.कुरखेडा,जि.गडचिरोली असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून तिने संतापाच्या भरात टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार,राणू ही सोनसरी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत राहून आठव्या वर्गात शिक्षण घेत होती.काल सोमवारी आश्रम शाळेत पालक सभा असल्याने तिचे पालक आश्रमशाळेत गेले होते. त्याचवेळेस राणू ही पालकांना भेटली व आरमोरी येथील दुर्गोत्सव पाहण्याचा आग्रह केला. मात्र,पालकांनी तिला समजावून सांगत काही पैसे दिले.ते तिने फाडून टाकले व मला घेऊन गेले नाही,तर ती जीवाचे बरेवाईट करेन म्हणून पालकांना म्हणाली.दरम्यान,पालक गावी जाण्यासाठी निघाले असता तिचा संताप अनावर झाला आणि आश्रमशाळेच्या वसतीगृहातील तिसऱ्या मजल्यावरील आपल्या खोलीत जात दार बंद केले आणि पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.सदर प्रकारची माहिती होताच आश्रमशाळेतील प्रशासनाने तात्काळ पोलिसांना पाचारण केले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कुरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय जगताप पथकासह घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान,पोलिसांनी मृतदेह खाली उतरवत पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.पुढील तपास कुरखेडा पोलीस प्रशासन करीत आहे. विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांची काळजी यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा...

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

‘यूपिआय’ वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ पासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर म्हणजेच 'मर्चेंट डिस्काउंट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!