Thursday, September 17, 2026
Homeकुरखेडाआदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांचा कुरखेडा शहर विचार मंचाच्या वतीने...

आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांचा कुरखेडा शहर विचार मंचाच्या वतीने गौरव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘डॉ.जे.पी.नाईक आदर्श प्राचार्य’ पुरस्कार प्राप्त करून श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविला आहे.त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुरखेडा शहर विचार मंचाच्या वतीने आज गुरुवारी महाविद्यालयात भावपूर्ण सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.मुनघाटे यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पेढा देऊन सन्मानित करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय कार्याचे कौतुक करत हा पुरस्कार कुरखेडा तालुका व गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली.
सत्कार सोहळ्यास शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी,माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राम लांजेवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोनेश मेश्राम,सामाजिक कार्यकर्ते केशव गुरनुले,प्रा.डॉ.दशरथ आदे,मधुकर बोबाटे,उपप्राचार्य प्रा.किशोर खोपे,लोकमतचे
पत्रकार सिराज पठाण आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस हवालदार अडकला एसीबीच्या जाळ्यात; पोलिस ठाण्याच्या आवारातच सापळा कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका पोलीस हवालदारास तब्बल ४० हजाराची लाच घेतांना नागपूरच्या एसीबी पथकाने पोलिस ठाण्याच्या आवारातच रंगेहाथ पकडले.सचिन तायडे असे लाचखोर पोलिस हवालदाराचे...

दुपारीच स्टेटमेंट दिला अन् सायंकाळीच निलंबनाचा आदेश धडकला.. – गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पर्यवेक्षकीय जबाबदारीत अक्षम्य निष्काळजीपणा व दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा शिवाजी लहाडे यांना...

वाघाच्या हल्ल्यात एकजण ठार; दुपारच्या घटनेने भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-गावालगतच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सावली...

भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांवर उच्चस्तरीय समितीसमोर पूर्व विदर्भातील परीक्षार्थींनी मांडल्या अडचणी,अपेक्षा व सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासह राज्यातील शासकीय भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित,विश्वासार्ह आणि उमेदवारकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने आज बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!