Wednesday, September 16, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात एकजण ठार; दुपारच्या घटनेने भीतीचे वातावरण..

वाघाच्या हल्ल्यात एकजण ठार; दुपारच्या घटनेने भीतीचे वातावरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-गावालगतच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सावली तालुक्यातील नीलसनी पेडगाव परिसरात घडली.वासुदेव लक्ष्मण वाकुडकर वय ६० वर्षे रा.निलसनी पेडगाव,ता.सावली,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. घटनेने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वासुदेव वाकुडकर हे नेहमीप्रमाणे आज बुधवारच्या सकाळी आपली जनावरे घेऊन गावालगतच्या सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड जंगल उपक्षेत्राच्या उपरी नियतक्षेत्रात गेले होते.गुरे चराई करीत होते,तर बाजूलाच उभ्या असलेल्या वासुदेव वाकुडकर यांचेवर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे हल्ला चढवला.यात वासुदेव वाकुडकर यांचा जागीच मृत्यू झाला.माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.घटनेचा अधिक तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांवर उच्चस्तरीय समितीसमोर पूर्व विदर्भातील परीक्षार्थींनी मांडल्या अडचणी,अपेक्षा व सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासह राज्यातील शासकीय भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित,विश्वासार्ह आणि उमेदवारकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने आज बुधवारी...

सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी नियमित बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील  आंधळी,नवरगाव,वाघेडा,बेलगाव,खैरी,मालदुगी आणि घाटी या सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी सकाळी व सायंकाळी नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी,अशी ठाम मागणी ग्राम...

प्रत्येक दुर्दैवी मृत्यूनंतर थेट डॉक्टरांना दोषी ठरवण्याऐवजी आजाराचे गांभीर्य समजून घेणे अत्यंत आवश्यक- जिल्हा शल्य चिकित्सक -डॉक्टरांकडून नवजात बालकाचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे वैद्यकीय प्रयत्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे दाखल झालेल्या एका क्षयरोगग्रस्त जोखमीच्या गरोदर मातेची तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करून मातेचा जीव वाचवण्यात...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा: क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ नाटकातील नाट्यांश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिध्द नाटककार तथा महाराष्ट्र शासन पुरस्कृत साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!