Tuesday, September 1, 2026
Homeचंद्रपूरधक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील नगराळा येथील अमरू नाईक माध्यमिक आश्रमशाळेत उघडकीस आली.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेसह स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिवती तालुक्याच्या नगराळा येथील अमरु नाईक माध्यमिक आश्रमशाळेत परिसरातील कुंभेझरी, पारधीगुडा,नागलोन,नोकेवाडी,पेदा,आकसापूर, नगराळा,शंकर लोधी,नागपाडा आदी गावांतील विद्यार्थी इयत्ता १ ते १० वी पर्यंत शिक्षण घेतात.येथे ५० विद्यार्थी निवासी असून आज सकाळच्या सुमारास डाळभाजी तयार करण्यात येत होती.त्याचवेळी डाळभाजीच्या भांड्यात जिवंत पाल पडले.मात्र,स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची कल्पनाच नव्हती. विद्यार्थी जेवणासाठी बसले आणि विद्यार्थ्यांनी काही अन्न खाल्ले. मात्र,डाळभाजी वाढत असतांना विद्यार्थ्यांना त्यात पालीचे लहान-मोठे तुकडे दिसून आले.दरम्यान,काही विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना तातडीने जिवती ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील उपचारार्थ राजुरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची सध्या प्रकृती स्थिर असून विद्यार्थ्यांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना होताच पालकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.प्रकरणाची चौकशी पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!