Monday, July 20, 2026
Homeचंद्रपूरदृश्य पाहून गावकऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला; चक्क एका महिलेच्या अंगावर बसून...

दृश्य पाहून गावकऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला; चक्क एका महिलेच्या अंगावर बसून मांस भक्षण करीत होती वाघीण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-सध्याच्या घडीला ग्रामीण भागात तेंदूपाने गोळा करण्याचा हंगाम सुरू आहे.दरम्यानच्या काळात जंगल परिसरातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असते.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे.जंगलात वाघाच्या दहशतीत तेंदूपाने तोडावी लागतात.तेंदूपाने तोडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील अनेक महिला टोळीने नेहमीप्रमाणे लगतच्या जंगलात गेल्या.१० वाजताच्या सुमारास या महिला तेंदूपानांचे ओझे घेऊन घरी परत आल्या.यातील कांता बुधाजी चौधरी,शुभांगी मनोज चौधरी व रेखा शालिक शेंडे या महिला दुपार झाली,तरीही घरी न परतल्याने गावकऱ्यांनी हातात डफली घेऊन जंगल परिसरात शोध मोहीम राबवली.अशातच दोन किलोमिटर आत जंगलात गेल्यानंतर पुढील दृश्य पाहून गावकऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला.वाघीण चक्क एका महिलेच्या अंगावर बसून मांस भक्षण करत होती.हे विदारक दृश्य पाहून गावकऱ्यांनी हातातली डफली वाजवायला सुरुवात केली असता, वाघीण तेथून पळून गेली.गावकऱ्यांच्या शोधात घटनास्थळी तिघींचेही मृतदेह आढळले.सदरची घटना सिंदेवाही वनपरिक्षेत्रात शहरापासून जवळच असलेल्या जंगलात काल, शनिवारी १० मे च्या दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.कांता बुधाजी चौधरी वय ६५ वर्षे, शुभांगी मनोज चौधरी वय २८ वर्षे व रेखा शालिक शेंडे वय ५० वर्षे, तिन्ही महिला चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील मेंढा (माल) येथील रहिवासी असून तेंदूपाने गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेल्या असता वाघाच्या हल्ल्यात ठार झाले आहेत.एकच वेळी एकाच गावातील तिघींना वाघाने ठार केल्याची पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

९० किलो प्रतिबंधित तंबाखूसह ७ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका चारचाकी वाहनाने मध्य प्रदेशच्या पांढुर्णा येथून सावनेर मार्गे नागपूरच्या दिशेने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या सावनेर तालुक्याच्या केळवद पोलिसांनी...

शाखा अभियंत्याच्या निलंबनानंतर आता ग्रामसेवक निलंबित.. – गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कारवाईचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मनमानीचा कारभार करू पाहणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्याने जिल्हा...

विविध गावात दहशत माजवणारी वाघीण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील विविध गावात दहशत माजवणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.विशेष म्हणजे,वाघिणीने समुद्रपूर तालुक्याच्या पिंपळगाव,उंदीरगाव,साखरा,...

अखेर उद्या होणारा डॉक्टरांचा राज्यव्यापी संप मागे; आरोग्य सेवा राहणार सुरळीत..

उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA) महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!