चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून मोबाईल फोन,रोख रक्कम आणि इतर आक्षेपार्ह साहित्य असा एकूण २२ हजार ८४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तर दोन पीडित महिलांची यातून सुटका करण्यात आली आहे.सदरचा अड्डा हा चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वॉर्ड परिसरातील लव इंडिया चर्चच्या मागील एका घरात छुप्या पद्धतीने सुरू होता. मुस्कान शेख वय ४० वर्षे,रा.रॉयनगर,लव इंडिया चर्चजवळ,चंद्रपूर व रेशमा उर्फ ताईबुल फातिमा अब्दुल रफीक शेख वय ४५ वर्षे,रा.टॉवर टेकडी,अष्टभुजा वॉर्ड,चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत.या प्रकरणी दोन्ही आरोपी महिलांवर चंद्रपूर शहराच्या रामनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ मधील कलम ३,४,५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे(एलसीबी)पोलीस उपनिरीक्षक संतोष निंबोरकर यांना गुरुवार १ ऑक्टोंबर रोजी शहरातील अष्टभुजा वॉर्डातील एका घरात काही महिलांकडून देहव्यापार अड्डा चालवल्या जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.माहिती मिळताच रात्रीच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने पंच व अनैतिक व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी सुरुवातीला एक बनावट ग्राहक पाठवला व खात्री केली.दरम्यान,बनावट ग्राहकाने इशारा करताच पथकाने घरावर छापा टाकला.यावेळी दोन महिला इतर पीडित महिलांकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपी महिलांना अटक केली व दोन पीडित महिलांची सुटका केली.सदरची कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ प्रमोद चौगुले,एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पीएसआय संतोष निंभोरकर,सुनील गौरकार व अंमलदार किशोर वैरागडे,महिला अंमलदार छाया निकोडे,निराशा तितरे,विजयमाला वाघमारे,अपर्णा मानकर यांच्या पथकाने पार पाडली.
राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

