Monday, September 28, 2026
Homeचंद्रपूरविहिरीतून पाणी काढणार तितक्यात अचानकपणे पाय घसरल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू..!

विहिरीतून पाणी काढणार तितक्यात अचानकपणे पाय घसरल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.दिवसभर शेतातील कामे आटोपून विहिरीतून पाणी काढणार तितक्यात  अचानकपणे पाय घसरून तोल गेला आणि थेट विहिरीतील खोल पाण्यात कोसळल्याने एका तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.अजय श्रीराम घोडमारे वय २८ वर्षे,रा.हिरापूर,ता.चिमूर, जि.चंद्रपूर असे विहिरीत पडल्याने बुडून मृत पावलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.ही धक्कादायक घटना काल रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चिमूर तालुक्यातील हिरापूर गावनजीकच्या शेतशिवरात घडली.
अजय घोडमारे व एक बारा वर्षीय चिमुकला शेतावर गेले होते.अजय यांनी सकाळच्या सुमारास शेतात पिकांना पाणी देऊन काहीकाळ विसावा घेतला.त्यानंतर,दुपारी चारच्या सुमारास विहिरीतून पाणी काढत असतांनाच त्यांचा तोल गेला.विहीर तुडूंब भरलेली असल्याने ते खोल पाण्यात बुडाले.दरम्यान, सोबत असलेल्या चिमुकल्याने आरडाओरड करून थेट गावाकडे धाव घेत घोडमारे कुटुंबीयांना घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली.लागलीच कुटुंबीय व गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली.मात्र,तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनेची माहिती पोलीस प्रशासनास मिळताच पोलिस हवालदार दुर्गेश नन्नावरे व पोलीस शिपाई लांजेवार यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिमूर रुग्णालयात पाठवला. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अचानकपणे घडलेल्या प्रसंगाने घोडमारे कुटूंबीय शोकसागरात बुडाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; बँकांचे कामकाज राहणार नियमित सुरू..

उद्रेक न्युज वृत्त :-देशभरातील बँक कर्मचारी आज, सोमवार २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांच्या संपावर जाणार होते.मात्र,संपाच्या पूर्वसंध्येला काल रविवारच्या रात्री इंडियन बँक्स...

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

मलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहीम; रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४१.६ टक्के घट.. -५६६ रुग्णांच्या बँक खात्यात २ लाख ८३ हजार रुपयांची बुडित मजुरी जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात हिवताप(मलेरिया)नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक,निदानात्मक व उपचारात्मक उपाययोजनांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.दुर्गम व डोंगराळ भागातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!