Sunday, September 27, 2026
Homeगडचिरोलीमलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहीम; रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४१.६ टक्के घट.. -५६६...

मलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहीम; रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४१.६ टक्के घट.. -५६६ रुग्णांच्या बँक खात्यात २ लाख ८३ हजार रुपयांची बुडित मजुरी जमा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात हिवताप(मलेरिया)नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक,निदानात्मक व उपचारात्मक उपाययोजनांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.दुर्गम व डोंगराळ भागातील आव्हानांवर मात करत आरोग्य कर्मचारी थेट वाड्या-वस्त्यांवर पोहोचून सेवा देत आहेत.प्रशासकीय नियोजन आणि आरोग्य यंत्रणेच्या क्षेत्रीय कामकाजामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील हिवताप रुग्णसंख्येत उल्लेखनीय घट नोंदविण्यात आली आहे.
ही मोहीम मलेरिया टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष डॉ. अभय बंग,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवी गावंडे आणि जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.माधव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबविली जात आहे.
  • डॉ.अभय बंग,अध्यक्ष मलेरिया टास्क फोर्स समिती, गडचिरोली👇
“गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत स्थानिक समाजाचा सहभाग मिळवणे आवश्यक होते.स्थानिक पुजारी आणि वैदू रुग्णांना वेळेत शासकीय तपासणीसाठी पाठवून सहकार्य करत आहेत.हा समन्वय आणि आरोग्य यंत्रणेचे प्रत्यक्ष भागातील काम यामुळे हिवताप नियंत्रणास मदत होत आहे.”
  • अविश्यांत पंडा,जिल्हाधिकारी गडचिरोली👇

“जिल्ह्यातील दुर्गम पाड्यांपर्यंत आश्रमशाळांसह १ लाख १६ हजार ३७२ औषधबाधित मच्छरदाण्यांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे.२५ विशेष पथकांमार्फत १ हजार१९५ गावांमध्ये कीटकनाशक फवारणी सुरू असून,भामरागड तालुक्यात शंभर टक्के फवारणी पूर्ण झाली आहे.आरोग्य विभाग दक्षतेने काम करत असून नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा आणि घराभोवती पाणी साचू देऊ नये.”

  • सुहास गाडे,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली👇
“दुर्गम भागातील नागरिकांचे आजारपणामुळे रोजगाराचे नुकसान होऊ नये,यासाठी संपूर्ण उपचार पूर्ण करणाऱ्या रुग्णांना ५०० रुपये थेट बँक खात्यात बुडित मजुरी दिली जात आहे.आतापर्यंत ५६६ रुग्णांच्या खात्यात २ लाख ८३ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी जिल्ह्यातील १ हजार ९०८ शाळांमध्ये ६७२ नोडल शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.”
  • आरोग्य विभागाच्या उपाययोजना व क्षेत्रीय कामकाज👇
 घरोघरी सर्वेक्षण व ‘आरडीके’द्वारे तात्काळ तपासणी-
आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी जंगलांमधील वाड्या-वस्त्यांवर जाऊन रॅपिड डायग्नोस्टिक किट(RDK)द्वारे मोफत व तात्काळ रक्ततपासणी करत आहेत.ज्या गावात एकही बाधित रुग्ण आढळतो,तिथे आरोग्य पथक सलग २८ दिवस थांबून दैनंदिन पाठपुरावा आणि सर्वेक्षण करते.दोन पेक्षा अधिक वार्षिक परजीवी निर्देशांक(API) असलेल्या संवेदनशील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर नियमित नियंत्रण व देखरेख ठेवली जात आहे.
डासोत्पत्ती नियंत्रण व फवारणी मोहीम👇
डासांची पैदास रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दर शनिवारी पाण्याचे साठे,डबकी व संकलित पाण्यामध्ये गप्पी मासे सोडणे आणि ॲबेटिंगसारख्या अळीनाशक मोहिमा राबविल्या जात आहेत.दुर्गम आणि संवेदनशील भागात प्रत्यक्ष कामासाठी १४४ हंगामी क्षेत्र कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. २५ पथकांमार्फत १ हजार १९५ गावांमध्ये कीटकनाशक फवारणी सुरू असून भामरागड तालुक्यात शंभर टक्के फवारणी पूर्ण करण्यात आली आहे.
  •  पुजारी व वैदूंना प्रोत्साहन मानधन👇
दुर्गम भागातील तापाचा रुग्ण वेळेत शासकीय तपासणीसाठी पाठवल्यास स्थानिक पुजारी व वैदूंना प्रति रुग्ण १५ रुपये आणि तपासणीत हिवताप आढळल्यास २०० रुपये प्रोत्साहन मानधन दिले जात आहे.या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १५ हजार २५० रुपये संबंधितांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
  • औषधबाधित मच्छरदाण्यांचे वाटप👇
डासांच्या चावण्यापासून संरक्षणासाठी जिल्ह्यातील आश्रमशाळा,वसतिगृहे आणि अतिसंवेदनशील गावांमधील नागरिकांना १ लाख १६ हजार ३७२ औषधबाधित मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले आहे.
  • उपचार पूर्ण करणाऱ्या रुग्णांना बुडित मजुरी👇
हिवतापबाधित रुग्णांनी उपचाराचा संपूर्ण कोर्स पूर्ण करावा यासाठी आरोग्य विभागाकडून आर्थिक साहाय्य दिले जात आहे.उपचार पूर्ण करणाऱ्या प्रत्येक रुग्णाला ५०० रुपये बुडित मजुरी थेट बँक खात्यात दिली जात असून,आतापर्यंत ५६६ रुग्णांना एकूण २ लाख ८३ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
  •  माहिती,शिक्षण व संवाद(IEC)उपक्रम👇
नागरिकांमध्ये आजाराविषयी जागृती निर्माण करण्यासाठी भिंतीचित्रे(Wall Paintings),आठवडी बाजारांमध्ये उद्घोषणा,माहितीपत्रके,तसेच ऑडिओ-व्हिडिओ संदेश प्रसारित केले जात आहेत.याशिवाय तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी इन्स्टाग्राम आणि यूट्यूब या सोशल मीडिया माध्यमांचा वापर केला जात आहे.शालेय स्तरावर जनजागृतीसाठी १ हजार ९०८ शाळांमध्ये ६७२ नोडल शिक्षक कार्यरत आहेत.
  •  हिवताप रुग्णसंख्या आकडेवारी👇
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवली गेली आहे:
८ महिन्यांची तुलना (जानेवारी ते ऑगस्ट)
 वर्ष २०२५ (जानेवारी ते ऑगस्ट): ५,९४९ रुग्ण
 वर्ष २०२६(जानेवारी ते ऑगस्ट): ३,४७५ रुग्ण
घट : २,४७४ रुग्ण (४१.६ टक्के घट)
 महिन्यानुसार तुलनात्मक स्थिती👇
जून : २०२५ मधील १,५६५ रुग्णांच्या तुलनेत २०२६ मध्ये रुग्णसंख्या थेट १३२ वर आली.
जुलै : २०२५ मधील २,५५६ रुग्णांच्या तुलनेत २०२६ मध्ये रुग्णसंख्या १,६८० नोंदवली गेली.
सप्टेंबर : सप्टेंबर २०२६ मध्ये २३ तारखेपर्यंत २४७ रुग्णांची नोंद झाली आहे.
  •  नागरिकांना आरोग्य विभागाचे आवाहन👇
१.ताप आल्यास घरगुती उपचार न करता अथवा ताप अंगावर न काढता तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात,उपकेंद्रात किंवा आशा स्वयंसेविकेकडे जाऊन मोफत रक्ततपासणी करून घ्यावी.
२.गावात येणाऱ्या आरोग्य विभागाच्या कीटकनाशक फवारणी पथकांना घरातील सर्व खोल्यांमध्ये फवारणीसाठी सहकार्य करावे.
३.घराच्या छतावर किंवा आजूबाजूला जुने टायर्स, रिकामी भांडी,नारळाच्या करवंट्या,कुलर व प्लास्टिक कचऱ्यामध्ये पाणी साचू देऊ नये;आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा.
४.रात्री व पहाटे झोपतांना नियमितपणे मच्छरदाणीचा वापर करावा आणि अंगभर कपडे परिधान करावेत.
५.आरोग्य विषयक माहिती,मार्गदर्शन व तातडीच्या मदतीसाठी शासनाच्या ‘१०४’ या २४ तास उपलब्ध असलेल्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा,असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!