Friday, September 25, 2026
Homeगडचिरोलीशिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे.शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील पात्र सदस्यांची ई-केवायसी येत्या १५ दिवसांत पूर्ण करून घ्यावी,असे आवाहन तहसीलदार सागर कांबळे गडचिरोली यांनी केले आहे.
ही प्रक्रिया रास्त भाव दुकानात ई-पॉस यंत्राद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने केली जात आहे.रास्त भाव दुकानदारांनी लाभार्थ्यांना आवश्यक सहकार्य करून प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
ई-केवायसी प्रलंबित राहिल्यास पुढील महिन्यापासून धान्य मिळण्यात अडचण येऊ शकते.त्यामुळे लाभार्थ्यांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करून धान्याचा लाभ नियमित सुरू ठेवावा,असे तहसीलदारांनी कळविले आहे.
  • सर्व नागरिकांना आवाहन👇
केवळ गडचिरोली जिल्ह्यातीलच नाही,तर राज्याच्या विविध जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.ई-केवायसीच्या माध्यमातून शासन स्तरावरून लाभार्थ्यांची गणना केली जाणार आहे.ज्यांची ई-केवायसी प्रलंबित राहणार अश्यांना धान्य मिळणे बंद होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने ज्या ठिकाणाहून धान्याची उचल करण्यात येत आहे; अश्या रास्त भाव दुकानात जाऊन लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया करून घ्यावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

पिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची ‘ही’ अवस्था; विचार येतेय की कोणत्या ठिकाणी विकास होताय? -शहराचा विकास होत आहे,चांगली गोष्ट आहे; पण गाव खेड्याकडे पण लक्ष...

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातला विकास होत आहे; पण याच्याकडे लक्ष देणार तरी कोण? रस्त्याची अवस्था पाहून विचार येतेय की,कोणत्या ठिकाणी विकास होताय गडचिरोली जिल्ह्याचा.कोणी...

‘पीएम-जनमन’ अंतर्गत तुलशी पिडसे यांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार.. – योजनेअंतर्गत ६ हजार ८७२ घरकुलांना मंजुरी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी येथील तुलशी दस्सा पिडसे यांच्या पक्क्या घराचे स्वप्न ‘पीएम-जनमन’ अंतर्गत मंजूर घरकुलामुळे साकार झाले आहे.प्रतिकूल कौटुंबिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!