Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीउच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत जास्त पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवावा.रस्ते,पूल,आरोग्य,शिक्षण,घरकुल व अन्य मूलभूत सुविधांमधील कमतरता निश्चित करून संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही तात्काळ सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पंडा यांनी काल मंगळवारी भामरागड तालुक्याचा विस्तृत दौरा केला.विशेष म्हणजे,आदिवासी गावांतील सुविधांसाठी नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.बारमाही रस्ते नसणे,नदी-नाल्यांवर पूल नसणे, आरोग्य शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधांमुळे पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो.रुग्णांना नेणे,तसेच अत्यावश्यक वस्तू व सेवा मिळवणेही कठीण होते.त्यामुळे,न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित गावांना पावसाळ्यात प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश दिले होते. पाहणीत आढळणाऱ्या समस्यांवर आवश्यक उपाययोजना करून आठ आठवड्यांत अनुपालन अहवाल न्यायालयात सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानुसार,जिल्हाधिकाऱ्यांनी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांसह पायाभूत विकासकामे आणि नागरिकांना उपलब्ध शासकीय सेवांचा आढावा घेतला.यावेळी पोलीस अधीक्षक एम.रमेश,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह विविध विभागांचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
  • अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले अधिकारी👇
दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हाधिकारी पंडा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी होड्री येथून लष्कर आणि गोपणार या अतिदुर्गम गावांपर्यंत दुचाकी वाहनांनी पोहोचले.या प्रत्यक्ष क्षेत्रभेटीत त्यांनी मार्गावरील दळणवळणाची स्थिती तसेच दुर्गम गावांमधील पायाभूत सुविधांची पाहणी केली.स्थानिक परिस्थिती आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांची प्रत्यक्ष माहिती घेत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.
  • अतिदुर्गम गावांच्या विकासावर विशेष भर👇
लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासासाठी प्रत्येक विभागाने आपल्या अखत्यारितील योजनांमधून पात्र नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा,असे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केले.विविध शासकीय योजनांचे प्रभावी अभिसरण करून या गावांतील मूलभूत सुविधांमधील कमतरता दूर करण्यासाठी कालबद्ध कार्यवाही करावी.दुर्गमतेमुळे कोणताही पात्र नागरिक शासकीय योजना व सेवांच्या लाभापासून वंचित राहणार नाही,याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी पंडा,पोलीस अधीक्षक रमेश आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गाडे यांनी लष्कर व गोपणार गावांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.रस्ते,पूल,आरोग्य व अन्य पायाभूत सुविधांशी संबंधित बाबींचा आढावा घेऊन प्रलंबित कामांवर संबंधित विभागांनी समन्वयातून तातडीने कार्यवाही करावी,असे निर्देश देण्यात आले.
  • १६ वनहक्क पट्टेधारकांना ७/१२ उताऱ्यांचे वाटप👇
या भेटीदरम्यान वनहक्क प्राप्त नागरिकांच्या महसुली अभिलेखांबाबतही कार्यवाही करण्यात आली.लष्कर येथील ५ आणि गोपणार येथील ११ अशा एकूण १६ वनहक्क पट्टेधारकांना ७/१२ उताऱ्यांचे वाटप करण्यात आले.वनहक्कधारकांना त्यांच्या पात्रतेनुसार विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
  • लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य शिबिराची पाहणी👇
जिल्हाधिकारी पंडा यांनी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.परिसरातील नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबिराचीही त्यांनी पाहणी केली. अतिदुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा नियमित व वेळेत उपलब्ध होतील,याची आरोग्य यंत्रणेने दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनांचा लाभ वेळेत मिळवून देण्यासह प्रलंबित घरकुलांच्या कामांना गती देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.
  • होड्रीतील बेली ब्रिज व जिल्हा परिषद शाळेची पाहणी👇
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी होड्री येथील बेली ब्रिजची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सद्यस्थितीची माहिती घेतली.रस्ते व पुलांशी संबंधित आवश्यक कामांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्यानंतर त्यांनी होड्री येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळेतील शैक्षणिक व मूलभूत सुविधांची माहिती घेतली.दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने विशेष लक्ष द्यावे,असे त्यांनी सांगितले.
  • हेमलकसा लोकबिरादरी शाळेलाही भेट👇
जिल्हाधिकारी पंडा यांनी हेमलकसा येथील लोकबिरादरी शाळेलाही भेट देऊन तेथील शैक्षणिक उपक्रम व उपलब्ध सुविधांची माहिती घेतली.
भामरागड तालुक्याची भौगोलिक दुर्गमता लक्षात घेऊन विविध विभागांनी परस्पर समन्वयातून काम करावे.नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित प्रलंबित कामे व अडचणींचे विभागनिहाय निराकरण करून विकासकामांना गती द्यावी.विशेषतः या अतिदुर्गम गावांमध्ये रस्ते,पूल,आरोग्य,शिक्षण,घरकुल तसेच इतर शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ वेळेत पोहोचवावा,असे निर्देश जिल्हाधिकारी  पंडा यांनी दिले.
या दौऱ्यात एटापल्लीचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत,भामरागडचे उपविभागीय अधिकारी शुभम पाटील,भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांच्यासह विविध विभागांचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!