Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीदत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या आदेशान्वये चार बालकांच्या नाते अंतर्गत दत्तक प्रक्रियेला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचना तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्र. १०८५/२०२३ मधील ४ मे २०२६ रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली.बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण)अधिनियमाच्या कलम ५६ (२)तसेच दत्तक नियमनावली,२०२२ मधील तरतुदींनुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे प्राप्त प्रकरणांची आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर पडताळणी करण्यात आली.
या प्रक्रियेत संबंधित प्रकरणांतील आवश्यक दस्तऐवज, कायदेशीर कागदपत्रे आणि दत्तक प्रक्रियेसाठी निर्धारित अटी व निकषांची सविस्तर छाननी करण्यात आली. आवश्यक निकषांची पूर्तता करणाऱ्या चार प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दत्तक आदेश जारी करण्यात आले.
या आदेशामुळे संबंधित बालकांच्या दत्तक संबंधांना कायदेशीर मान्यता प्राप्त झाली असून,त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे कायदेशीर पालकत्व मिळाले आहे. यामुळे बालकांना स्थिर व सुरक्षित कौटुंबिक वातावरणात संगोपन मिळण्यासोबतच त्यांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने दत्तक संबंधांना कायदेशीर आधार प्राप्त झाला आहे.
ही कार्यवाही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.प्रकरणांची आवश्यक पडताळणी व प्रशासकीय कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले आणि बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसूटकर यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!