- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी उतरविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर..अश्याच प्रकारची घटना नागपूर-अमरावती मार्गावरील वाडी परिसरातील आठवा मैल येथील आठवडी बाजाराजवळ उघडकीस आली आहे.एका पठ्ठ्याने अवैध आणि बनावट दारूची वाहतूक करण्यास दिमाक लावला खरी,पण तो अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.ट्रकमध्ये वरून भंगार म्हणजेच टिन-टप्पर भरला आणि त्याच्या खाली तब्बल ३९० खोके बनावट देशी दारूच्या बॉटल ठेवल्या.प्रत्येक खोक्यात ९० मिलीच्या शंभर बॉटल म्हणजेच तब्बल ३९ हजार देशी दारूच्या बॉटल आढळून आल्या.प्रकरणी नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने दारूचा साठा,इतर साहित्य आणि ट्रक असा एकूण २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.अब्दुल तौसिफ अब्दुल हफीज वय ३४,रा. गवळीपुरा,गिट्टीखदान,नागपूर असे अटकेतील आरोपी ट्रक चालकाचे नाव असून त्याच्याविरोधात वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे,राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्राथमिक तपासणीत सदरची देशी दारू ही बनावट असल्याचे स्पष्ट झाले.यातील धक्कादायक बाब म्हणजे,बनावट देशी दारूचा साठा हा नागपूरवरून गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे नेण्यात येणार होती.ही कारवाई काल रविवारी नागपूर-अमरावती मार्गावरील आठवा मैल परिसरातील आठवडी बाजाराजवळ करण्यात आली.चौकशीत आरोपी चालकाने सदरचा साठा हा अंकुश ऊर्फ अन्ना सुधाकर कुंचनवार वय ३८ वर्षे,रा.यशवंतनगर,हिंगणघाट,वर्धा याच्या सांगण्यावरून धुळे येथून आणल्याचे पोलिसांना सांगितले.या प्रकरणी अंकुश कुंचनवारचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.महत्वाचे म्हणजे,सदरच्या कारवाईवरून गडचिरोली जिल्ह्यातील तळीराम हे असली दारू म्हणून नकली दारू पीत असल्याचे स्पष्ट होत आहे.यापूर्वीही अश्याच प्रकारे अवैध नकली दारू
पुरविण्यात आली असावी,असा संशय बळावला आहे.
त्यातच,दारू सापडली म्हणून माहीत पडले,नाहीतर परिसरात मोठा झिंगाट झाला असता.लांब दूरवरून अवैध दारूची मोठी खेप गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत असल्याने जिल्ह्यातील दारूबंदीचा पुरता फज्जा उडाला आहे.
- Advertisement -

