Sunday, September 20, 2026
Homeगडचिरोलीअवैध दारू विक्रेत्यांना दणका; देसाईगंज आणि आरमोरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील दारू विक्रेते...

अवैध दारू विक्रेत्यांना दणका; देसाईगंज आणि आरमोरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील दारू विक्रेते तडीपार.. -देसाईगंजच्या कुरूड गावातील दारू विक्रेतीचा समावेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात दारुबंदी असतांनाही राजरोसपणे अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात खरी,पण काही वेळातच घरी पाठवले जात असल्याने दारू विक्रेते आणखी जोमाने कामाला लागतात.काही दारू विक्रेत्यांच्या मते,दारूची केस म्हणजे काही नाही, थोडावेळ पोलीस ठाण्यात नेतात,दोन पट्टे मारतात
आणि सोडून देतात.नंतर काय तर कोर्टात तारखेवर जा लागते आणि केस समाप्त.या सर्व कथानकांमुळेच अवैध दारू विक्रीचे धंदे व अवैध दारू वाहतूक बंद होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे.अश्यातच सध्या स्थितीत गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नुकतेच ३ सप्टेंबर २०२६ रोजी देसाईगंज शहराच्या गांधी वार्डातील ४७ वर्षीय महिला दारु विक्रेती रजनी रामचन्द्र आत्राम या महिलेला तब्बल एक वर्षासाठी चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर तडीपार(हद्दपार)करण्याचा आदेश देण्यात आलेला असतांनाच परत आता देसाईगंज आणि आरमोरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील दारू विक्रेत्यांनाही थेट गडचिरोलीसह चंद्रपूर,भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांतून तब्बल एक वर्षासाठी तडीपार(हद्दपार) करण्यात आले.या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
देसाईगंज पोलिसांच्या रडारवर असलेल्या नंदा हरिदास शिंगाडे वय ४८ वर्षे,रा.कुरुड,ता.देसाईगंज आणि संगिता वामन जांभूळकर वय ५१ वर्षे,रा.बर्डी-विसोरा, ता.देसाईगंज यांच्याविरोधात अवैध दारू विक्रीसह विविध गुन्ह्यांची नोंद आहे.नंदा शिंगाडे हिच्या विरोधात १५ गुन्हे,तर संगिता जांभूळकर विरोधात १४ गुन्हे दाखल आहेत.तर आरमोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ईश्वरदास देविदास खेडेकर रा.देलनवाडी,ता.आरमोरी
आणि सुनील रामचंद्र जिभकाटे रा.शेगांवटोला, ता.आरमोरी यांच्याविरोधातही अवैध दारू विक्रीसह विविध गुन्ह्यांची नोंद आहे.ईश्वरदास याचेवर ८,तर सुनील जिभकाटे वर ११ गुन्हे दाखल आहेत.वारंवार गुन्हे दाखल होऊनही संबंधितांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव देसाईगंज उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी प्रसेनजित प्रधान यांच्याकडे सादर केला.उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी,देसाईगंज(वडसा) यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (१)(ब)अन्वये हद्दपारीचे आदेश जारी केले.त्यानुसार,संबंधितांना गडचिरोली,चंद्रपूर,भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार(हद्दपार)करण्याचे आदेश देण्यात आले.हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून संबंधित व्यक्ती गडचिरोली जिल्ह्यात आढळल्यास त्यांना अटक करून त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
  • एम.रमेश,गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक👇
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात यापुढेही कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

उद्याला गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाची खरीप शिवार फेरी.. – एकाच ठिकाणी २२८ पीक वाण व तंत्रज्ञान शिफारशींची प्रात्यक्षिके व शास्त्रज्ञांशी थेट संवादाची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६...

आता प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव.. – डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकणाऱ्या दुकानदारांना बसणार चाप..

उद्रेक न्युज वृत्त :-आता देशातील प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.विशेष म्हणजे,भारताच्या सर्वोच्च औषध सल्लागार संस्थेने देशभरातील प्रत्येक केमिस्ट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!