Friday, September 18, 2026
Homeगडचिरोलीशासकीय वसतिगृह उपलब्ध नसलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज...

शासकीय वसतिगृह उपलब्ध नसलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील अनुसूचित जाती/नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय,गडचिरोली यांच्यामार्फत सूचित करण्यात आलेय की,ज्या तालुक्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही; अशा तालुक्यातील विद्यार्थ्यांना थेट भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज भरता येतो.गडचिरोली जिल्ह्यातील कोरची,कुरखेडा,धानोरा, भामरागड,एटापल्ली,सिरोंचा,देसाईगंज(वडसा),मुलचेरा या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही आणि गडचिरोली,आरमोरी,अहेरी तालुक्यात फक्त मुलींचे शासकीय वसतिगृह उपलब्ध आहे व चामोर्शी,गडचिरोली येथे मुलांचे वसतीगृह उपलब्ध आहे.त्यामुळे वरील तालुक्यांतील विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहाऐवजी थेट स्वाधार योजनेचाच अर्ज भरणे आवश्यक आहे.
तालुक्यांतील काही विद्यार्थ्यांनी नजरचुकीने अन्य तालुक्यातील शासकीय वसतिगृहाचा प्रवेश अर्ज सादर केलेला आहे.संबंधित तालुक्यात वसतिगृह अस्तित्वात नसल्याने अशा विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या प्रवेश देणे शक्य नाही.तरी अशा विद्यार्थ्यांनी ज्या वसतिगृहाचा अर्ज भरला आहे अशा वसतिगृहाच्या गृहपाल यांच्याशी २५ सप्टेंबर २०२६ रोजी पर्यंत संपर्क साधून आपला अर्ज रद्द करण्याबाबतचा लेखी अर्ज(ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत,आधार कार्ड प्रत व शैक्षणिक संस्थेचे मूळ बोनाफाईड प्रमाणपत्रासह)सादर करावा,जेणेकरून त्यांना विनाविलंब ३० सप्टेंबर २०२६ रोजी पर्यंत स्वाधार योजनेचा अर्ज भरता येईल,असे डॉ.सचिन मडावी
सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; एकाचा मोबाइल हॅक करून उडवले दोन लाख,तर दुसऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत उकळले साडेचार लाख..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सायबर चोरटे म्हणजेच ऑनलाईन फसवणूक करणारे अज्ञात चोरटे 'या ना त्या' मार्गाने सर्वसामान्य नागरिकांना जाळ्यात अडकवून फसवणूक करतात. अश्याच प्रकारे सायबर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात प्रकल्प लेखन कार्यशाळा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय,देसाईगंज येथील वाणिज्य शाखेच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP-२०२० नुसार बी.कॉम.सेमिस्टर १,३...

‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया’ २०२६-२७’ अंतर्गत १० टन क्षमतेचे तेल काढणी युनिट,मिनी ऑईल मिल व गोदाम बांधकामासाठी अनुदान.. – ऑफलाइन आणि ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भुईमूग,करडई,इतर तेलबिया व इतर पिकांचे काढणी पश्चात होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर मूल्यवर्धनाला(Value Addition)चालना देण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे.केंद्र...

वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट; वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात आज,गुरुवार १७ सप्टेंबर रोजी काही भागात अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावून वीज कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!