- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आता देशातील प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.विशेष म्हणजे,भारताच्या सर्वोच्च औषध सल्लागार संस्थेने देशभरातील प्रत्येक केमिस्ट दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची शिफारस केली आहे.याचा मुख्य उद्देश म्हणजे औषधांच्या अवैध विक्रीला आळा घालणे व सीसीटीव्ही फुटेजमुळे एक डिजिटल नोंद तयार होऊन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रीप्शन)औषधे विकणाऱ्या दुकानदारांना चाप बसेल.मादक वेदनाशामक औषधे आणि सवय लावणारी खोकल्याची औषधे कायदेशीर पुरवठा साखळीतून चोरून बेकायदेशीर बाजारात जात असल्याबद्दल औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना बऱ्याच काळापासून चिंता होती. तसेच,राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने देखील मुलांमधील अंमली पदार्थांच्या व्यसनाला प्रतिबंध घालण्यासाठी अधिक कडक देखरेखीची मागणी केली होती.औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली असून,विक्रीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आणि संपूर्ण पुरवठा साखळीत मादक व मनोविकारी औषधांची नोंद ठेवण्याची शिफारस केली आहे.हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरी आणि अंमलबजावणीसाठी भारताचे औषध नियंत्रक महासंचालक डॉ.राजीव सिंह रघुवंशी यांच्याकडे असून आरोग्य मंत्रालयाने पुढील तीस दिवसांच्या आत या प्रस्तावित सुधारणेवर सूचना व आक्षेप मागवले आहेत.या सूचना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अवर सचिव(औषधे)यांच्याकडे पाठवता येतील किंवा drugsdiv-mohfw@gov.in या ईमेलवर पाठवता येतील.
- Advertisement -

