Saturday, September 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार आहे; तर उद्या रविवारी उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.विशेषतः विदर्भात आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस,तर रविवार १३ सप्टेंबर आणि १४ सप्टेंबर रोजी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.त्याचबरोबर,मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.तर मराठवाड्यात आज काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचे पुनरागमन होऊन राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे स्थानिक पातळीवर पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.कोकणातही आज,शनिवार १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!