- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा रचून लिपिकास २ हजार रुपये घेतांना रंगेहाथ पकडले. स्वप्नील गोविंद म्हात्रे,लिपिक,आरोग्य खाते,के/पश्चिम वॉर्ड,अंधेरी,महानगरपालिका,मुंबई असे लाचखोर लीपिकाचे नाव असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं.२६/२०२६ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
प्रकरणातील तक्रारदार २४ वर्षीय तरुण असून त्यांच्या विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खाते,के/पश्चिम वॉर्ड,म.न. पा.,मुंबई येथील लोकसेवक स्वप्नील म्हात्रे, लिपीक यांनी तक्रारदार यांचेकडे चार दिवसांपूर्वी म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी शासकीय फी व्यतिरिक्त १ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दुसऱ्याच दिवशी ८ सप्टेंबर रोजी मुंबईच्या लाच प्रतिबंध विभागात तक्रार दाखल केली.त्यानुसार,प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने ८ सप्टेंबरला पथकाने पडताळणी केली असता,लिपिक स्वप्नील म्हात्रे यांनी तक्रारदार यांच्याकडे २ हजार रुपये लाचेची मागणी करुन लाच स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर,९ सप्टेंबरला सापळा रचण्यात आला व सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक स्वप्नील म्हात्रे यांना तक्रारादार यांच्याकडून २ हजार रुपये लाच स्विकारतांना के/पश्चिम वॉर्डच्या आरोग्य खात्याच्या ऑफिसमध्येच रंगेहाथ पकडण्यात आले.याप्रकरणी लीपिकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
- सदरची कारवाई :-
सापळा अधिकारी-श्रीमती रेखा काळे, पोलीस निरीक्षक,मो.नं.९२२६८५८०३५
पर्यवेक्षक अधिकारी- हरिदास किल्लेदार,सहाय्यक पोलीस आयुक्त,मो.नं.९८२१११६८६४.
सापळा पथक- पो.ह.०१७८५/चव्हाण २) पो.ह. ०४०३९०/गायकवाड ३) म.पो.ह.०४११३०/ तोडणकर ४) पो.शि.१८१२४२/राणे ५)म.पो.शि. ०९१०८०/नलावडे ६)पो.शि. ०९२९४८/गायकवाड
७) पो.ह.चा. ०७००९९/पुरळकर ८) पो.ह.चा. ०७१६५६/देसाई
मार्गदर्शन- संदिप दिवाण,अप्पर पोलीस आयुक्त, ला.प्र.वि.,मुंबई २)अनिल घेरडीकर,अप्पर पोलीस उप आयुक्त(१),ला.प्र.वि.,मुंबई,मो.नं. ७७९६५९११००
३)अनंत साळुंखे,अप्पर पोलीस उप आयुक्त(२), ला.प्र.वि.,मुंबई, मो.नं. ८२७५१८८११९
- Advertisement -

