Sunday, April 19, 2026
Homeमुंबईगडचिरोली जिल्ह्याचा आवाज गुंजला मुंबईमध्ये…-देशासाठी एकजुटीने कार्य करू- युवा पंतप्रधान सुरज चौधरी

गडचिरोली जिल्ह्याचा आवाज गुंजला मुंबईमध्ये…-देशासाठी एकजुटीने कार्य करू- युवा पंतप्रधान सुरज चौधरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संसद २०२३ मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते.त्या ठिकाणी गडचिरोली येथील सुरज चौधरी यांनी पंतप्रधान म्हणून संसदेत संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. सभागृहात शांतताप्रिय नेते आणि अभ्यासक दृष्ट्या अगदि सखोलपणे गांभीर्याने उत्तरे मांडणारे व दोन्ही पक्षांत अर्थपूर्ण वादविवाद घडवून आणनारे नेते म्हणून त्यांनी संसदेतील सभागृहात सर्वांची मने जिंकली.हा देश फक्त बार्डरवर नसून या देशात जगणाऱ्या प्रत्येक शेवटच्या सामन्य माणसात आहे.त्याला माणुस म्हणून हक्काच जगणे आणि जगण्याचे समाधान लाभावे हेच राज्यकर्ते तथा या देशातील सर्व नेत्यांचे आणि सर्व क्षेत्रांतील देशप्रेमी यांचे कर्तव्य असावे ही भावना व्यक्त केली.ज्या ठिकाणी देशाच्या बाबतीत सरकार चुकतेय त्या ठिकाणी सरकारलाही झुकावे लागेल.माफी मागावी लागेल आणि ती चुक बदलून घ्यावी लागेल.यात कुठलीच हयगय केली जाणार नाही; या देशात देशापेक्षा महत्वाचे दुसरे काहीच नाही.हा देश पुढे नेण्यासाठी एकजूटीने कार्य करण्याची गरज आहे चारित्र्यवान नेत्यांची गरज आहे; असे ते बोलले. तळागाळातून तळमळीने सभागृहा पर्यंत प्रश्न घेऊन आलेल्या सर्व जिल्ह्यातील युवा मंत्री महोदयांना देखील त्यांनी विनंती करत अपेक्षा व्यक्त केली. समाजातील सर्वच प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी आपण एकजूटीने कार्य करू व महाराष्ट्रातील तमाम युवांनी आपल्यावर टाकलेला विश्वास जपू; असे ते सभागृहाच्या सुरवातीला आपल्या भाषनातून व्यक्त केले.तसेच संसदेत पंतप्रधान सुरज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली

महिला व बालविकास मंत्रालया कडून मंत्री महोदय प्रियंका ठाकरे यांनी महिला व युवती विकासासाठी विधेयक मांडले.शिक्षण मंत्री महोदय राजश्री आडे यांनी शिक्षण संकल्प विधेयक मांडले व गृहमंत्री शंतणु फडणविस यांनी दिव्यांग बांधवांना लोकसभा व प्रत्येक राज्याच्या विधानसभे मध्ये प्रतिनिधित्व मिळण्याबाबत विधेयक मांडले.संसदेत आलेले प्रत्येक युवा मंत्री हे आपल्या क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी व विकास साधण्यासाठी प्रयत्न करतील; अश्या वैचारिक भावनेने संसदेत युवांनी समाजातील प्रत्येक प्रश्नांवर मत मांडले.यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात युवा मंत्री युनिसेफ  आणि नेहरू युवा केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली समाजासाठी कार्य करीत राहणार असा विश्वास युवा पंतप्रधान सुरज चौधरी यांनी सभागृहाच्या शेवट आभार  करतांना व्यक्त केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!