Friday, June 26, 2026
Homeभंडाराकहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. - जंगल परिसरात महिलेचा...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची घटना शुक्रवार,१७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी उघडकीस होती.साधना सीताराम उईके वय ५२ वर्षे,रा.धनेगाव, ता.तुमसर, जि.भंडारा असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.विशेष म्हणजे,जंगल परिसराच्या भागात सदरची घटना उघडकीस आल्याने प्राथमिकदृष्ट्या एखाद्या वन्य प्राण्याचा हल्ला असल्याचा अनेकांचा समज झाला. मात्र, शवविच्छेदन अहवाल करतांनाची प्रक्रिया आणि इतर काही तांत्रिक घटनाक्रमावरून कहाणीमध्ये ट्विस्ट आला आहे.शवविच्छेदन करतांना मृतदेहाच्या बाह्य भागाची तपासणी केली असता,गळ्यावर दोन इंचाची अत्यंत धारदार जखम आढळली.आश्चर्याची बाब म्हणजे, गळ्याच्या दुसऱ्या बाजूला कोणत्याही जखमांच्या खुणा नव्हत्या. वन्यजीव गतज्ज्ञांच्या मते,जर वाघ किंवा बिबट्याने गळ्याचा घोट घेतला असता,तर दोन्ही बाजूंनी खोलवर आणि गोलाकार जखमा आढळल्या असत्या. ही एकतर्फी धारदार जखम एखाद्या शस्त्राची असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
  • संशयाकडे इशारा👇
प्रत्यक्ष घटनास्थळावरील स्थिती आणि ज्या ठिकाणी रक्ताचे डाग आढळले,तिथून मृतदेह तब्बल दोन किलोमीटर पुढे अंतरावर सापडला आणि तोही सुमारे पंधरा फूट खोल खंदकात(खड्डा)आढळला.जर वाघाने वा बिबट्याने मृतदेह तिथे ओढून नेला असता,तर तो स्वतःही त्या खंदकात पडला असता.त्यांच्या पाऊलखुणा दिसून आल्या असत्या.विशेष म्हणजे, खंदकाजवळून जाण्यासाठी एक सुव्यवस्थित बाजूचा रस्ता उपलब्ध होता.अशा परिस्थितीत मृतदेह थेट खंदकात आढळणे ही बाब नैसर्गिक शिकार करण्याच्या पद्धतीशी जुळत नाही. त्याचबरोबर,एखादा वन्य प्राणी मृतदेह ओढत नेत असतांना जमिनीचा भाग हा सपाट नसतो.यात पृष्ठभाग पूर्णपणे सपाट झाला होता.सामान्यतः हिंस्त्र प्राणी जेव्हा सावज(शिकार)ओढून नेतात,तेव्हा शरीराच्या टाचा किंवा इतर भाग जमिनीला घासल्याने विशिष्ट खुणा उमटतात. मात्र,इथे मृतदेह एखाद्या पोत्यात बांधून ओढून नेला असावा,असे जमिनीच्या स्थितीवरून लक्षात आले आहे. खांद्यापासून कंबरेपर्यंत शरीर ओरखडले गेले असले,तरी टाचांना कोणतीही इजा झालेली नाही,ही बाब लक्षणीय आहे.जंगल परिसरात मृतदेह मिळाल्यामुळे वनविभागाने सुरुवातीला हा वाघाचा वा बिबट्याचा हल्ला असल्याचे मानले असले,तरी वरील सर्व तांत्रिक बाबी पाहता हत्येचा वा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध स्वयंरोजगार कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.. – ५ लाखांपासून ते ५० लाखांपर्यंत मिळणार कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विमुक्त जाती,भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच वडार,रामोशी,लोहार,गवळी, विणकर आणि नाथपंथी समाजातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक बळ मिळावे,रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात आणि...

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!