- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाने पतीला फरफटत नेत ठार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.बंसीलाल मेश्राम वय ५५ वर्षे,रा. दावेझरी,ता.तुमसर,जि.भंडारा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे.
आज गुरुवारच्या सकाळी नेहमीप्रमाणे बंसीलाल मेश्राम हे आपल्या पत्नीसोबत गायी,म्हशी चराईसाठी गावाजवळील चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गेले होते.गुरे चराई करत असतांना दोघेही पती-पत्नी काही अंतरावर उभे असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे बंसीलाल यांच्यावर झडप घातली. पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाने बंसीलाल यांना जबड्यात पकडून जंगल परिसरात फरफटत नेले.दरम्यान,पत्नीने जोरजोराने ओरडायला सुरुवात केली आणि कशीबशी धावत-पळत सुटून गावात येत सदर घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जंगल परिसरात शोधमोहीम राबवली असता बंसीलाल मेश्राम मृतावस्थेत आढळून आले. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
- Advertisement -

