Tuesday, August 18, 2026
Homeभंडाराअल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून गेला आहे.सदरची घटना ही भंडारा शहरातील मेंढा भागात घडली.विशेष म्हणजे,ज्या मुलाची हत्या करण्यात आली व आरोपी हे दोघेही एकाच वयाचे असून एकाच भागातील रहिवासी आहेत.अंशू(हंस) गजानन येरकडे वय १५ वर्षे असे मृतक मुलाचे नाव असून तो भंडारा शहरातील भागीरथा भास्कर शाळेत इयत्ता नवव्या वर्गात शिकत होता.तर संशयीत आरोपी १५ वर्षाचा असून हत्येनंतर आरोपीने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.आरोपी मुलाने लोखंडी हत्याराने अंशूची हत्या केली.मात्र,हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

सट्टा-पट्टीचे आकडे घेणारा ताब्यात..!

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या सट्टा-पट्टीचे आकडे घेणाऱ्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ हजार १५० रुपयांची रोख,सट्टा-पट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी,बॉलपेन व रायटिंग...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!