Tuesday, August 18, 2026
Homeगडचिरोलीसर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये याप्रमाणे एकूण १५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.मुख्यमंत्री सचिवालयाने याबाबत जिल्हाधिकारी,गडचिरोली यांना कळविले आहे. दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची शासकीय मदत यापुर्वीच मंजूर करण्यात आली आहे.त्याव्यतिरिक्त,आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आणखी ही मदत मंजूर करण्यात आली आहे.
जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात १० ऑगस्ट २०२६ रोजी सर्पदंशाची घटना घडली होती.या घटनेत दीपिका एकता लकडा,अनु गुजाम कोरेटी आणि सुष्मिता सरोजित मंडल या तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता.या विद्यार्थिनींच्या वारसांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून,तिन्ही विद्यार्थिनींच्या वारसांसाठी एकूण १५ लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.मंजूर अर्थसहाय्याची रक्कम जिल्हाधिकारी,गडचिरोली यांच्या संबंधित बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सचिवालयाच्या निर्देशानुसार मृत विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांची आवश्यक ती संपूर्ण पडताळणी करून त्यांना अर्थसहाय्याचे वाटप करण्यात येणार आहे.तसेच मंजूर निधीचा विहित प्रयोजनासाठी विनियोग झाल्याबाबतचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री सचिवालयास सादर करावे लागणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

सट्टा-पट्टीचे आकडे घेणारा ताब्यात..!

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या सट्टा-पट्टीचे आकडे घेणाऱ्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ हजार १५० रुपयांची रोख,सट्टा-पट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी,बॉलपेन व रायटिंग...

आता गडचिरोलीत होणार विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक मच्छीमार, मत्स्यकास्तकार,आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने गडचिरोली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!