- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला आहे.अश्यातच काही बँका,पतसंस्था वा इतर वित्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी तगादा लावतांना दिसून येतात.या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावून नये,कर्जवसुलीच्या दबावामुळे एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर संबंधित बँक,पतसंस्था तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणेला जबाबदार धरले जाईल, असा इशारा दिला आहे.नुकतेच महसूलमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्याच्या १५ तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला.दुष्काळी परिस्थितीत पीक कर्जवसुलीला स्थगिती देण्यात आली असून,या काळात कोणत्याही बँक किंवा पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांच्या दारात वसुलीसाठी जाऊ नये. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनीही याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात,असे निर्देश देण्यात आले आहेत.शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत वारंवार सूचना करूनही प्रतिसाद न देणाऱ्या बँकांबाबतही बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली.शासनाची विविध खाती ज्या बँकांमध्ये आहेत, त्या बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास सहकार्य करणे अपेक्षित आहे.मात्र,आदेश देऊनही कर्जवाटप न करणाऱ्या बँकांमधून सरकारी खाती काढून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. संबंधित बँकांनी १५ दिवसांत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे,असेही निर्देश देण्यात आलेत.
दरम्यान,दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडून कार्यवाही सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्राचे पथक,राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी(एनडीआरएफ)तसेच दुष्काळ निवारण समिती आणि मंत्रिमंडळ उपसमितीच्या माध्यमातून मदतीचे नियोजन केले जात आहे.शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
- Advertisement -

