Monday, October 5, 2026
Homeभंडाराआज भारतीय किसान संघातर्फे ट्रॅक्टर मोर्चा; चार जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शेतकरी होणार...

आज भारतीय किसान संघातर्फे ट्रॅक्टर मोर्चा; चार जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शेतकरी होणार सहभागी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-धानाला योग्य हमीभाव,प्रलंबित बोनस तातडीने द्यावा,दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळलेले भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुके  समाविष्ट करावेत आणि धानाचे चुकारे ४८ तासात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत,या प्रमुख मागण्यांसाठी आज,सोमवार ५ ऑक्टोंबरला
भारतीय किसान संघातर्फे साकोली येथे भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे.दुपारी बारा वाजता उपविभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार असून पूर्व विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
संघाच्या विदर्भ प्रांताच्यावतीने आयोजित या आंदोलनात भंडारा,गोंदिया,चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी होणार आहेत. ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या संख्येने शेतकरी साकोलीत दाखल होणार असल्याने आंदोलनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.या मोर्चाला भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष साई रेड्डी संबोधित करणार आहेत.संघाचे अखिल भारतीय अधिकारी नाना आखरे यांचीही उपस्थिती राहणार आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटित ताकद दाखवून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.धानाला योग्य भाव, बोनस,दुष्काळी मदत आणि वेळेत चुकारे या शेतकऱ्यांच्या मुलभूत मागण्या आहेत.या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होऊन आपली एकजूट दाखवावी,असे आवाहन किसान संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पांडे,जिल्हा मंत्री दिनेश कापगते,गोंदिया जिल्हाध्यक्ष डॉ.मंगल बिसेन आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.आज दुपारी बारा वाजता साकोली उपविभागीय कार्यालयासमोर होणाऱ्या या आंदोलनातून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!