Sunday, October 4, 2026
Homeनागपूर"उमेद मॉल"च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने दुसरा टप्पा जाहीर केला असून या दुसऱ्या टप्प्यात तब्बल २१ जिल्ह्यांमध्ये “उमेद मॉल” उभारण्यात येणार आहेत.यात पुणे विभागातील कोल्हापूर,सांगली,कोकण विभागातील पालघर, रायगड,सिंधुदुर्ग,नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर,नंदूरबार,धुळे, छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना,नांदेड, लातूर,हिंगोली,परभणी,अमरावती विभागातील अमरावती,वाशिम,बुलढाणा,तर नागपूर विभागातील चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया आणि भंडारा इत्यादी जिल्ह्यांचा समावेश असून प्रत्येक जिल्ह्यात सुमारे २० कोटी रुपये खर्चुन अत्याधुनिक “उमेद मॉल” उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे.यामुळे ग्रामीण महिला उद्योजकांना मोठे व्यासपीठ मिळणार आहे.विशेष म्हणजे,पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये “उमेद मॉल”च्या इमारत बांधकामाची निर्मिती करण्यास  शासनाने मान्यता दिली आहे.त्यातच,ग्रामविकास विभागाने मॉलसाठी सुधारित आराखडा तयार केला आहे.एकूण जागेपैकी ५० टक्के जागा मोकळ्या मॉल इमारतीसाठी, ३० टक्के वाणिज्यिक व्यवहारांसाठी तर २० टक्के जागा सोयी-सुविधांसाठी राखीव राहणार आहे.ग्राहकांसाठी ५० चारचाकी आणि १०० दुचाकींसाठी पार्किंग,सीसीटीव्ही सुरक्षा कक्ष, स्वच्छतागृहे,स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ आणि दिव्यांगांसाठी रॅम्प-रेलिंगची सुविधा असेल. केवळ विक्रीच नव्हे तर प्रशिक्षणासाठी शंभर ते दीडशे आसन क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल,विश्रांती कक्ष आणि आधुनिक प्रशिक्षण केंद्रही उभारले जाणार आहे.ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नसेल,अश्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!