- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता भारतीय जनता पक्षाने आज, रविवार ४ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.यात नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ यांचा समावेश आहे.विशेष म्हणजे, नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून सुधाकर कोहळे,अनिल सोले आणि सुधीर दिवे या तीन नावांची चर्चा होती.भाजपच्या उमेदवार निवडीसाठी पक्षांतर्गत चर्चा सुरू असतांनाच सुधाकर कोहळे यांच्या नावावर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली.सुधाकर कोहळे हे पेशाने शिक्षक असून नागपूर महानगर पालिकेत दोन वेळा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.त्यांनी नागपूर महानगर पालिकेत पाणीपुरवठा सभापती म्हणून काम केले आहे.ते २०१४ मध्ये पूर्व नागपूर मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरलेले असून काँग्रेसचे डॉ.अभिजित वंजारी उद्या, सोमवार सकाळी १० वाजता अर्ज भरणार आहेत. जीपीओ चौकातून ते विभागीय आयुक्त कार्यालयात जातील.यानंतर लॉ कॉलेज चौकातील जवाहर विद्यार्थी गृहात प्रचाराचा श्रीगणेशा केला जाणार आहे.
- भाजपचे उमेदवार आणि मतदारसंघ👇
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ :-सुधाकर विठ्ठलराव कोहळे
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ :-डॉ.स्मिता योगेश जाधव
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ :-कौस्तुभ गावडे
- Advertisement -

