Tuesday, July 28, 2026
Homeभंडारादुपारची दुर्दैवी घटना; मुलीच्या लग्न मंडपातच वडिलांचा मृत्यू...

दुपारची दुर्दैवी घटना; मुलीच्या लग्न मंडपातच वडिलांचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-मुलीचे लग्न समारंभ आटोपले आणि सनई चौघडा व ढोल ताशांचा गजर सुरू असतांनाच लग्न मंडपातच वडिलांना छातीत अचानक दुखू लागल्याने खाली कोसळले.त्यातच त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील झारली गावात आज,मंगळवार २९ एप्रिलला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.ऐन मुलीच्या लग्न मंडपातच वडिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शांतता पसरली.गणेश खरवडे वय ५४ वर्षे असे मृत मुलीच्या वडिलांचे नाव आहे.
गणेश खरवडे यांची मुलगी पल्लवी हीचा मोठ्या थाटामाटात आज मंगळवारी दुपारच्या सुमारास लग्न सोहळा पार पडला.सनई चौघडा व ढोल ताशांचा गजर सुरू होता.वऱ्हाडी पाहुणे मंडळींची जेवणासाठी अंगत-पंगत सुरू झाली.वडील लग्न मंडपात देखरेख करीत होते.अशातच त्यांच्या छातीत दुखू लागले व ते खाली कोसळले.खाली कोसळताच नातेवाईकांनी धाव घेतली. तोपर्यंत वडिलांची प्राणज्योत मावळली.घटनेने संपूर्ण पावणे मंडळी व गावकरी सुन्न झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!