Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीअपघातातील एसपी कार्यालयाच्या वरिष्ठ लिपिकाचा उपचारादरम्यान मृत्यू..

अपघातातील एसपी कार्यालयाच्या वरिष्ठ लिपिकाचा उपचारादरम्यान मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या एसपी(पोलीस अधीक्षक) कार्यालयात कार्यरत वरिष्ठ लिपिकाचा आज, मंगळवारी २९ एप्रिलला सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनात हळहळ व्यक्त केली जात आहे.विलास शंकर वासनिक वय ५७ वर्षे रा.मुरखळा,ता.गडचिरोली असे मृत पावलेल्या वरिष्ठ लीपिकाचे नाव आहे.
माहितीनुसार,विलास वासनिक हे आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घरून गडचिरोली शहराच्या जिल्हा व सत्र न्यायालय परिसर चौकातून दुचाकीने एसपी कार्यालयात कर्तव्य बजावण्याकरीता जात होते.अशातच त्यांच्या दुचाकीला हायवा ट्रक क्रमांक- एमएच ३४ एम८९७० ने जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,ते जागीच कोसळले व मुका मार लागून डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.घटना घडताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.नागरिकांनी तात्काळ गडचिरोली पोलिसांना कळविले असता त्यांनी तात्काळ विलास वासनिक यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र,प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तात्काळ नागपूरला हलविण्यास सांगितले.त्यानुसार गडचिरोलीचे प्रभारी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पोलीस विभागाच्या हेलिकॉप्टरने नागपूर येथील ऑरेंज सिटी रूग्णालयात दाखल केले असता अखेर उपचारादरम्यान विलास वासनिक यांचा मृत्यू झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!