Tuesday, October 27, 2026
Homeगडचिरोलीउद्याला गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची...

उद्याला गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने  उद्या,बुधवार २८ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर चंद्रपूर, गोंदिया,नागपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असून मेघगर्जना व विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.दरम्यान,उद्याला गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस,विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर नागरिक व शेतकऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
  • तारखेनुसार हवामानाचा अंदाज👇
आज २७ ऑक्टोंबर – येलो अलर्ट : जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उद्या २८ ऑक्टोंबर – ऑरेंज अलर्ट : जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे.
२९ ऑक्टोंबर – येलो अलर्ट : बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
३० ऑक्टोंबर : तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • विजांचा कडकडाट होत असताना घ्यावयाची खबरदारी👇
– मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्यास बाहेर जाणे टाळावे.विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा.
– बाल्कनी,छत,घराबाहेरील ओटा तसेच उघडी दारे व खिडक्यांजवळ थांबू नये.
– उंच झाडांखाली,धातूच्या मनोऱ्याजवळ किंवा तात्पुरत्या तंबू व शेडमध्ये आसरा घेऊ नये.
– तारांचे कुंपण,विजेचे खांब आणि लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे.पाण्यात असल्यास तात्काळ बाहेर पडावे.
– लँडलाईन फोन व विद्युत उपकरणांचा वापर टाळावा.पाण्याचे नळ आणि पाइपलाइन यांना स्पर्श करू नये तसेच शॉवरखाली आंघोळ करू नये.
शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज आणि संबंधित विभागाच्या सूचनांनुसार शेतीकामाचे नियोजन करावे. नागरिकांनी हवामानाच्या परिस्थितीकडे लक्ष ठेवावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घ्यावी,असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
  • आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा👇
दूरध्वनी : ०७१३२-२२२०३१ / २२२०३५
मोबाईल : ९४२३९११०७७ / ८२७५३७०५०८ / ८२७५३७०२०८
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२७ वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा; आज सकाळची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपूर येथील एका २७ वर्षीय तरुणाने घरी कुणीही नसतांना स्वतःच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना...

नागपूर पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? राजकीय वर्तुळात उत्सुकता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज,मंगळवार २७ ऑक्टोंबरला जाहीर होणार असून अभिजीत वंजारी वर्सेस सुधाकर कोहळे यांच्यापैकी कोण बाजी मारणार,याबाबत...

सावंगीच्या जिल्हा परिषद शाळेत एमएसडब्लू विद्यार्थ्यांचे क्षेत्रकार्य संपन्न; विविध उपक्रमांतून सामाजिक जागृती..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-अनिकेत समाजकार्य महाविद्यालय देसाईगंज येथील एमएसडब्लू(MSW) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी येथे २१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोंबर २०२६...

उपाययोजनांचे सकारात्मक फलित; गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदविण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!