Tuesday, September 8, 2026
Homeभंडारावैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; गोसेखुर्दचे १५ दरवाजे खुले..

वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; गोसेखुर्दचे १५ दरवाजे खुले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने धूमधडाका सुरू ठेवल्याने सततच्या पावसामुळे प्रमुख जलाशयांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. अश्यातच संततधार पावसामुळे पाण्याची आवक वाढल्याने गोसेखुर्द धरण प्रकल्पाचे १५ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून नदीपात्रात १८३१.९६ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.यामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गोसेखुर्दचा जलसाठा ५८.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे.सध्या  जिल्ह्यासाठी पावसाचा ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर येत्या सोमवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.काही दिवसांपासून कोसळलेल्या समाधानकारक पावसामुळे भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर इतरही जिल्ह्यातील शेतीकामांना वेग आला असून धान रोवणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.पाऊस कायम राहिल्यास खरीप हंगामात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!