Tuesday, September 8, 2026
Homeचंद्रपूरवाघाचा दोनवेळा हल्ला; एकाचा मृत्यू,दुसरा बचावला..

वाघाचा दोनवेळा हल्ला; एकाचा मृत्यू,दुसरा बचावला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-गावालगतच्या महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या(एफडीसीएम)जंगल परिसरात गुरे  चारण्यासाठी गेलेल्या दोन गुराख्यांवर वाघाने हल्ला चढवून एकाला ठार केले,तर दुसरा हल्ल्यापासून थोडक्यात बचावल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभूर्णा तालुक्यातील सातारा भोसले जंगल परिसरात घडली.
उष्टू विठ्ठल पोरेते वय ५६ वर्षे,रा.सातारा भोसले, ता.पोंभूर्णा,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या गुराख्याचे नाव आहे.तर नीलकंठ रामभाऊ पेंदोर वय ३७ वर्षे यांचा जीव वाचला.
काल गुरुवारच्या सकाळी दोघेही गुराखी गावालगतच्या महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक-४४१ मधील जंगल परिसरात गुरे चारत होते.अश्यातच दुपारच्या सुमारास जंगल परिसरातून मार्गक्रमण करत आलेल्या वाघाने उष्टू पोरेते यांच्यावर हल्ला चढवला.यात ते गंभीर जखमी झाले.दोघांची चांगलीच झटापट झाल्याने वाघ काही अंतरावर जाऊन झुडपात दबा धरून बसला.दरम्यान,उष्टू पोरेते जखमी अवस्थेत काही अंतर चालत गेले.डोक्याला टॉवेल गुंडाळून विश्रांती घेत असतांनाच परत दुसऱ्यांदा वाघाने हल्ला चढवून उष्टू पोरेते यांना ठार केले.सदरचा संपूर्ण प्रकार नीलकंठ पेंदोर यांच्या डोळ्यादेखत घडल्याने त्यांची बोबडी वळली.त्यांनी आरडाओरड करून झाडीत आश्रय घेत स्वतःचा बचाव केला.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच उमरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण सोनोणे पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.मृतदेह शवविच्छेदनासाठी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.घटनेने सातारा भोसले परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!