- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात आज गुरुवारच्या सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली.गावी जाण्यासाठी निघालेल्या इसमाचा चक्क गावनजीकच्या परिसरातील नाल्याजवळ मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदरची घटना भामरागड तालुक्याच्या तुमरकोठी येथे उघडकीस आली.कोमटी मासू वड्डे वय ४४ वर्षे, रा.तुमरकोठी,ता.भामरागड,जि.गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.
तुमरकोठी येथील कोमटी वड्डे हे काल बुधवारी सायकलने मरकनार येथे काही कामासाठी गेले होते. कामे आटोपून सायंकाळच्या सुमारास मरकनार येथून आपल्या स्वगावी तुमरकोठी येथे जाण्यासाठी निघाले. मात्र,रात्र होऊनही ते घरी परतले नाही.अश्यातच आज सकाळच्या सुमारास काही ग्रामस्थांना नाल्याजवळ एक सायकल दिसून आली.दरम्यान,शोध मोहीम सुरू असतांनाच नाल्याजवळ कोमटी वड्डे यांचा मृतदेह आढळून आला.प्रकरणी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्या दिशेने तपास सुरू आहे.
- Advertisement -

