Tuesday, September 8, 2026
Homeगोंदियाट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात...

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने घडलेल्या अपघातात तब्बल सहा जणांचा जागीच मृत्यू झाला,तर सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल सोमवारी दुपारच्या सुमारास घडली,मात्र आज मंगळवारी सर्वत्र उघडकीस आली आहे.अपघातात मृत पावलेले मध्य प्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. भीषण अपघातात ३ वर्षीय आरुष मात्रे रा.सावरी, किरण संतोष वैद्दे वय २६ वर्षे, रा.लोडाना,संतोष मात्रे वय ३८ वर्षे,सुशिला मात्रे वय ३५ वर्षे,दोघेही रा.किन्ही,रुपसेन सत्यकर वय ३५ वर्षे आणि ज्योती सत्यकर वय ३२ वर्षे अशी मृतकांची नावे आहेत. तर लक्ष्मी पंचाल वय २७ वर्षे,संतोष वैद्दे वय ३५ वर्षे, राकेश बाहे वय २४ वर्षे,भुमेश्वर मात्रे वय ४७ वर्षे,संगीता मात्रे वय ३५ वर्षे,राजेंद्र पंचाले वय ३० वर्षे व चालक संदीप बाहे अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.जखमींवर सध्या गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार,मध्य प्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर परिसरातील रहिवासी असलेले १३ कामगार एमपी १५ टी ३४९५ क्रमांकाच्या पिकअप वाहनाने तेलंगणातील जगतीहाल,करीमनगर येथे रोजगारासाठी निघाले होते.दरम्यान,गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एमएच ३५ एजे २५४७ क्रमांकाचा एक ट्रक वेगात गोंदियाकडून येत असतांनाच दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.धडक इतकी भीषण होती की,पिकअप वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यातच तब्बल सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा भीषण आवाज ऐकू येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू करून पोलिसांना पाचारण केले.गोंदिया ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहनात अडकलेल्या  जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.सध्या जखमींवर उपचार सुरू असून पोलिसांकडून अपघाताची नोंद करण्यात आली व पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी निघालेल्या कामगारांवर अचानक ओढवलेल्या संकटाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!