Thursday, September 3, 2026
Homeगोंदियासील झालेल्या ईव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये उघडून पुन्हा सील.. - तहसील कार्यालयावर हल्लाबोल..

सील झालेल्या ईव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये उघडून पुन्हा सील.. – तहसील कार्यालयावर हल्लाबोल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-नुकतेच मंगळवार २ डिसेंबरला गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा नगरपंचायतीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर सील झालेल्या ईव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये उघडून पुन्हा सील करण्यात आल्या.यामुळे उमेदवार आणि प्रतिनिधींनी तहसील कार्यालयावर हल्लाबोल केला,ज्यामुळे वातावरण तापले.निवडणूक आयोगाला अहवाल पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी तहसीलदार मोनिका कांबळे यांची उचलबांगडी करत कारभार अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्याकडे सोपविला. सालेकसा नगरपंचायतीचे १७ नगरसेवक आणि एका नगराध्यक्षासाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. मतदानानंतर ईव्हीएम मशीन पंचासमक्ष सील करण्यात आल्या.त्या पेट्या सालेकसा तहसील कार्यालयातील स्ट्रॉगरूममध्ये नेण्यात आल्या.त्यानंतर मशीन बंद आहे की सुरू हे तपाण्याकरीता निवडणूक विभागाने कोणत्याही पक्षाच्या प्रतिनिधींनी किंवा उमेदवारांना पाचारण न करता परस्पर सील उघडून पुन्हा सील केले.त्यामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात संशय बळावला. सालेकसा नगरपंचायतीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड प्रकरणावरून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना शिंदे गट,शिवसेना या उद्धव गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी तहसील कार्यालयामध्ये घेराव करून याविषयी स्पष्टीकरण मागितले होते.त्यावरून जवळपास १२ तास आंदोलन करण्यात आले.त्यानंतर रात्री उशिरा प्रकरणातील अहवाल हा उपविभागीय अधिकाऱ्यांनी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आणि राज्य निवडणुकीला आयोगाला पाठवण्यात आला.त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग यावर कोणते निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु स्थानिक काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून वोट टेम्परिंग तर झाली नाही ना असा संशय व्यक्त केला. कॉंग्रेसचे बबलू कटरे यांनी तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्यामार्फत या प्रक्रियेत सहभागी असलेल्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.त्यात निवडणूक अधिकाऱ्यांवर आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.या दबावापोटी दुपारनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सालेकसाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोनिका कांबळे यांची उचलबांगळी करत त्यांच्याऐवजी अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्याकडे सालेकसाचा प्रभार सोपविला.मात्र प्रभार काढून नव्हे,तर तात्काळ निलंबन व्हावे या विषयात उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदार,सालेकसा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि या प्रक्रियेत जे कोणी सहभागी आहेत,त्या सर्वांचे निलंबन करून निवडणूक पुन्हा घेण्यात यावी,अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!