Tuesday, October 20, 2026
Homeचंद्रपूर'तिच्या' त्रासाला अन् वादाला वैतागला; शिक्षकाने केली प्रेयसीची हत्या..!

‘तिच्या’ त्रासाला अन् वादाला वैतागला; शिक्षकाने केली प्रेयसीची हत्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर प्रेयसीच्या हत्येने झाल्याची घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली.प्रेयसीच्या हत्येप्रकरणी आरोपी शिक्षकास अटक करून त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला गुरुवार २२ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.संतोष भगवान साखरकर वय ४९ वर्षे,रा.चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.तर वैशाली विलास टिपले वय ४५ वर्षे,रा.चंद्रपूर असे मृतक महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,प्रकरणातील आरोपी शिक्षक संतोष साखरकर याचे तीन ते चार वर्षापूर्वी वैशाली टिपले हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. सुरुवातीला ‘तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही,’ असे म्हणत शिक्षकाने प्रेमाची कबुली दिली.मात्र,काही कालांतराने प्रेम अतीजड वाटायला लागला.म्हणजेच ‘तू माझ्याशिवाय कुणाशीही बोलू नको,तू माझ्या जवळच रहा,तू केवळ माझाच आहेस,अश्या नाना तऱ्हेच्या त्रासदायक गोष्टी प्रेयसी महिलेकडून होऊ लागल्या. महिलेचा त्रास आणि वाद विकोपाला जात असल्याने संतोष वैतागला होता.दरम्यान,घटनेच्या दिवशी म्हणजेच बुधवार १४ ऑक्टोंबर २०२६ रोजी संतोष आणि वैशाली हे दोघेही कारने चंद्रपूरजवळील आरवट जंगल परिसरात गेले.तिथेही वारंवार त्रास आणि वैताग आणणाऱ्या गोष्टी सुरू केल्याने प्रियकर शिक्षकाने पहिल्यांदा प्रेयसीचा गळा आवळला व नंतर तिच्या छातीवर मोठा दगड मारून हत्या केली.हत्येनंतर त्याला पश्चात्ताप झाल्याने तिच्या मृतदेहाजवळ बसून तो दोन तास ढसाढसा रडला. मात्र,या घटनेतून सुटका कशी करून घ्यायची,याचा विचार करून त्याने मृतदेह स्वतःच्या कारच्या डिक्कीत ठेवला.तो दिवसभर मृतदेह कारमध्ये ठेवून फिरत राहिला.रात्री घरी परतल्यानंतर तो शांतपणे झोपला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची,याचा विचार त्याने केला.दुसऱ्या दिवशी गुरुवार १५ ऑक्टोंबरला संतोषने नागपूर गाठले.दरम्यान,नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील आधार नगरी परिसरात त्याच्या घराच्या बांधकामाधीन घरातील टाकीत मृतदेह पुरून टाकला.या कृत्यानंतर तो घाबरला.त्याने संपूर्ण घटना वकील मित्राला सांगितली.मित्राने त्याला तातडीने पोलिसांना सत्य सांगून शरण जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार,संतोषने शहर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून आपबिती सांगितली.त्यानंतर,चंद्रपूरचे पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे आणि त्यांचे पथक शनिवारी रात्री १०.३० वाजता आरोपीला घेऊन हिंगणा पोलिस ठाण्यात पोहोचले.हिंगण्याचे ठाणेदार प्रदीप घोंगे आणि उपनिरीक्षक संतोष राठोड यांनी तहसीलदारांना याबाबत माहिती दिली.नायब तहसीलदार नितीन गोहणे यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.महसूल अधिकारी,पोलिस आणि पंचांच्या उपस्थितीत व्हिडिओ चित्रीकरण करत खोदकाम करण्यात आले.रविवारी पहाटे सुमारे दीड वाजता जमिनीखाली पुरलेला महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.पंचनामा केल्यानंतर मृतदेह चंद्रपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला व आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले.हत्याकांडप्रकरणी आणखी काही महवाचे खुलासे व इतर तपास करायचा असल्याने पोलिसांनी आरोपीस पोलीस कोठडी देण्याच्या विनंती वरून न्यायालयाने आरोपीस गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी,अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार...

गडचिरोली सायबर कमांडो पथकाची उल्लेखनीय कामगिरी.. -हरवलेले तब्बल ६ लाख रुपये किंमतीचे २१ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विजयादशमी हा सण सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविण्याचा संदेश देतो.याच शुभमुहूर्तावर आज गडचिरोली पोलीस स्टेशनने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा.. -दहा दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-सन २०२६ च्या खरीप हंगामात अनियमित पाऊस,वाढते तापमान,वादळ,कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच वन्यप्राण्यांमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर देसाईगंज...

आज दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या स्मृतींना उजाळा देणारा ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!