Tuesday, October 6, 2026
Homeचंद्रपूरवाघाचा हल्ला महिलेचा मृत्यू..!

वाघाचा हल्ला महिलेचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शेतातील कामे आटोपून तलावालगतच्या शेतात खताच्या पिशव्या धूत असतांना जंगल परिसरातून मार्गक्रमण करत आलेल्या वाघाने अचानकपणे शेतकरी महिलेवर हल्ला चढवला.यात शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारच्या दुपारी चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी शिवारात घडली.मंदाबाई सूर्यभान मंगाम वय ६० वर्षे, रा.आगरझरी,ता.जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.मंदाबाई ही काल सोमवारच्या दुपारी शेतात खताच्या पिशव्या धूत होती.त्यावेळी वाघाने तिच्यावर हल्ला केला.त्यानंतर तिला काही अंतरापर्यंत ओढत नेले. यातच तिचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच मोहर्ली(प्रादेशिक) वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिये, दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेगावकर यांच्यासह पोलीस पथक आणि वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.वन विभागाच्या वतीने मृत महिलेचे पती सूर्यभान लक्ष्मण मंगाम यांना तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपयांची रक्कम देण्यात आली. आगरझरी हे गाव ताडोबाच्या लगत असल्यामुळे या परिसरात अनेकदा वाघ व इतर वन्य प्राण्यांचा वावर असतो.त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नैनपूर तलावावर विद्यार्थ्यांनी घेतला पक्षी निरीक्षणाचा अनोखा अनुभव.. -वन्यजीव सप्ताहाच्या सहाव्या दिवशी देसाईगंज वनविभागाचा स्तुत्य उपक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज :-पुस्तकातील निसर्ग शिकण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन त्याला प्रत्यक्ष अनुभवणे अधिक प्रभावी असते,याचा सुंदर प्रत्यय वन्यजीव सप्ताह २०२६ अंतर्गत सहाव्या दिवशी नैनपूर...

नितेश कराळे मास्तरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात नितेश...

मतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना सुनावणीची नोटीस प्राप्त झाली असली,तरी निवडणूक...

बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावून नये; जीवाचे बरे वाईट केल्यास यंत्रणेला जबाबदार धरले जाईल- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला आहे.अश्यातच काही बँका,पतसंस्था वा इतर वित्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!