- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-वर्ध्यातील ‘फिनिक्स अकॅडमी’चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात नितेश कराळे यांनी आज,सोमवार ५ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.अर्ज दाखल करण्यासाठी जातांना त्यांनी मोठी रॅली काढून महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारखी विशेष वेशभूषा केली होती.त्यांनी आपल्या रॅलीदरम्यान पदवीधरांचे बेरोजगारी,सरकारी नोकरभरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता हे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.कराळे मास्तर म्हणाले की, ‘बॅलेट पेपरवर पक्षाचे चिन्ह नाही.तर फक्त उमेदवाराचे नाव असते याचा मला भरपूर फायदा होणार आहे.मी महाराष्ट्रात शिव फुले आंबेडकर विचारधारा पेरत आतापर्यंत तीन हजार सभा घेतल्या आहेत.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,सावित्रिबाई फुले,बिरसा मुंडा,भगतसिंह या सर्वांना देशाच्या विकासात आणि स्वातंत्र्यात योगदान दिले आहे.त्यामुळे मी आज फुलेंच्या वेशभूषेत आलो आहे.’ “आता काहीही झाले तरी मी माघार घेणार नाही आणि अर्जही मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

- Advertisement -

